ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘लकी’साठी ‘लकी’ ठरला पुणे दौरा

‘लकी’साठी ‘लकी’ ठरला पुणे दौरा

दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी ‘लकी’ खरोखरच लकी ठरत आहे. नुकतीच ‘लकी’ सिनेमाच्या स्टारकास्टने पुण्याला भेट दिली. या निमित्ताने लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अभय महाजन, अभिनेत्री दिप्ती सती आणि गायक चैतन्य देवढे यांनी पुण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधला.

luckee-in -pune

संजय जाधव यांचं पुणे प्रेम

दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलेले फिल्ममेकर संजय जाधव यांना पुणे आणि पुणेकरांबद्दल खास प्रेम आहे. ते यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं. पुणे भेटीबद्दल ते म्हणाले की, “पूण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधायला मला खूप आवडतं. सिनेमाचे जाणकार इथे आहेत. माझ्या प्रत्येक सिनेमाच्या वेळी पूण्यातल्या पत्रकारांना भेटणं आणि पूण्यात सिनेमाचा प्रिमीयर करणं हा माझा रिवाज असतो. लकी सिनेमा पूणेकरांना खूप आवडेल. याची मला पूर्ण खात्री आहे.”  

ADVERTISEMENT

‘लकी’ चित्रपटाच्या ‘कोपचा’ गाण्यातून जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट

सिनेमा पुण्यात हिट तर अख्ख्या महाराष्ट्रात हिट

एम एस धोनी आणि फ्लाइंग जाटसारख्या सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. त्यांनीही पुणेकरांबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया, “पूणेकरांना सिनेमा आवडला की, तो अख्ख्या महाराष्ट्राला आवडतो, असं म्हटलं जातं. पुणेकरांनी नेहमीच संजयदादांच्या सिनेमावर भरभरून प्रेम केलंय. त्यामूळे पूणेकरांपर्यंत सिनेमा पोहोचवायला आम्ही आलो आहोत. लकीमधून तुम्ही 2019 मधली कॉलेज युवकांची धमाल मजेदार कथा अनुभवायला मिळेल आणि ती तुम्हांला खूप आवडेल असा मला विश्वास आहे.”

अस्सल पुणेकर अभय महाजन

ADVERTISEMENT

आजपर्यंत प्रायोगिक सिनेमात दिसलेला पूण्याचा अभिनेता अभय महाजन पहिल्यांदाच ‘लकी’मधून  व्यावसायिक सिनेमात दिसणार आहे. अभय महाजन लकीने पूर्ण झालेल्या इच्छाबद्दल म्हणाला की, “प्रत्येक अभिनेत्याला आपणही लार्जर दॅन लाइफ सिनेमाचा हिरो व्हावं, असं वाटतं. सिनेमात आपली हिरोसारखी लक्षवेधी एन्ट्री व्हावी. आपण पोस्टरवर असावं, या माझ्या सर्व इच्छा लकीमूळे पूर्ण झाल्या. त्यातही संजयदादांच्या सिनेमाचा भाग होणं ही खूप भारी गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वत:ला अतिशय लकी समजतो की, मी या सिनेमाचा भाग आहे.”

दीप्तीचं स्वप्न ‘लकी’मुळे झालं पूर्ण  

लकीमधून अभिनेत्री दिप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. दिप्ती म्हणाली की, “मी आजवर संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण एक दिवस त्यांच्या सिनेमाची हिरोइन बनून मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. तसंच मॉडेलिंगच्या निमित्ताने पूण्यात नेहमी येणा-या माझी आज पूण्यात होर्डिंगस लागलेली पाहणं, खरंच स्वप्नवत आहे. मी खरंच खूपच लकी आहे की, मी संजयदादांच्या सिनेमाचा भाग आहे.”

‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचं पहिलंवहिलं ‘माझ्या दिलाचो’ गाणं झालं रिलीज

ADVERTISEMENT

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात नवोदित अभिनेत्री दिप्ती सती आणि अभिनेता अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

25 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT