'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक झालं रिलीज

'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक झालं रिलीज

हिंदी सिनेमांमध्ये आपण बरेचदा प्रमोशनल साँग किंवा सिनेमाचा वेगळा टायटल ट्रॅक रिलीज केलेला पाहतो. पण मराठीत असं सहसा दिसत नाही. पण आता पाहायला मिळणारे ते आगामी 'लकी'च्या निमित्ताने. मराठी सिनेसृष्टीतले चार सुपरस्टार्स एका गाण्यासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक नुकतंच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आलं. अभय महाजन-दिप्ती सती या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव यावेळी उपस्थित होते.


 


गाण्याच्या निमित्ताने सुपरस्टार्सचं ‘रियुनियन’


आगामी ‘लकी’ चित्रपटाच्या टायटल ट्र्र्र्रॅकसाठी मराठीत सॉलिड स्टार्सची टीम एकत्र आपल्याला दिसणार आहे.

या गाण्याची हींट अभिनेत्री सई ताम्हणकरने आधीच तिच्या इन्स्टा अकाउंटवर दिली होती.‘येरे येरे पैसा’ नंतर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत यांच्यासोबत पुन्हा एकदा या गाण्याच्या निमित्ताने काम करता आलं आणि आमच्यासाठी हे जणू ‘रियुनियन’ असल्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सिद्धार्थ जाधवने दिली. तर तेजस्विनी पंडीतचीही हीच प्रतिक्रिया होती. 'येरेयेरे पैसा' आणि ‘तूही रे’नंतर तेजस्विनी आणि सई तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. तर प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल, अशी प्रतिक्रिया अभिनेता उमेश कामत याने दिली.


सई, तेजस्विनी, सिद्धार्थ आणि उमेशचा स्वॅग लूक


IMG-20190128-WA0012


सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत यांच्यावर हे सॉलिड गाणं चित्रीत करण्यात आलंय. या गाण्यासाठी चारही स्टार्सनी खास व्हाईट आणि डेनिम असं हॅपनिंग कॉम्बिनेशन केलं होतं. पाहा या गाण्याचा धम्माल व्हीडीओ -

Subscribe to POPxoTV

‘लकी’च्या गाण्याचं जबरदस्त लाँच


IMG-20190128-WA0011
पूण्यात झालेल्या या सोहळ्याला पुणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती. याबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, “या गाण्याच्या लाँचला खूप भारी प्रतिसाद मिळाला. टाळ्या,शिट्या आणि जल्लोषाने खच्चून भरलेल्या मॉलमध्ये गाण्याचे लाँच करण्याचा अनुभव अद्भूत होता. प्रेक्षकांनी माझ्यावर आत्तापर्यंत जे प्रेम केले आहे, त्याचा मी ऋणी आहे आणि मला विश्वास आहे, लकी सिनेमाला ते असाच भरभरून प्रतिसाद देतील.” लकी सिनेमाचं हे टायटल ट्रॅक रसिकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असेल, अशी प्रतिक्रिया निर्माते सुरज सिंग यांनी दिली. यो (सचिन पाठक) यांनी हे गाणं लिहीलं असून या गाण्याला अमितराज यांनी संगीतबध्द केलंय आणि गायलंय.


IMG-20190128-WA0013


गोव्यात चित्रीकरण करण्यात आलेला हा धम्माल चित्रपट असून दिग्दर्शन संजय जाधव यांचं आहे. तर 'लकी'च्या निमित्ताने पहिल्यांदाच दिप्ती सती आणि अभय महाजन ही फ्रेश जोडी आपल्याला दिसणार आहे. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.


हेही वाचा -


‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचं पहिलंवहिलं ‘माझ्या दिलाचो’ गाणं झालं रिलीज


'लकी' चित्रपटाच्या ‘कोपचा’ गाण्यातून जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट