संजय जाधव यांच्या ‘लकी’ (Luckee) चित्रपटाचं ट्रेलर रिलीज

संजय जाधव यांच्या ‘लकी’ (Luckee) चित्रपटाचं ट्रेलर रिलीज

 


‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होते ते ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच या दोन्ही मान्यवरांनी ‘लकी’च्या ट्रेलर लाँचला चारचांद लावले.


अभय महाजनच्या 'लकी' चित्रपटाचं हटके पोस्टर लाँच


‘लकी’ म्हणजे धम्माल

Subscribe to POPxoTV

दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट म्हंटल्यावर धम्माल असणार आणि लकीचं ट्रेलर पाहिल्यालर पहिली प्रतिक्रिया हीच येते. दुनियादारी, चेकमेट, रिंगा रिंगा, येरे येरे पैसा, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे आणि गुरू यांसारखे एकापेक्षा एक चित्रपट दिल्यावर संजय जाधव यांनी आता ‘लकी’ फॅक्टर आजमवायचं ठरवलं आहे. ही कथा आहे लकी या तरूणाची जो स्वतःसाठी सोडून बाकी सगळ्यांसाठी लकी आहे. ज्याला हवं आहे हॅपनिंग आयुष्य आणि एक गर्लफ्रेंड. जी त्याला मिळतेही आणि मग सुरू होतात त्याचं आयुष्य कसं हॅपनिंग होतं त्याची ही धम्माल गोष्टी.


47585615 135423460807671 4846018826680246535 n


लकीमधून पहिल्यांदाच आपल्यासमोर अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दीप्ती सती ही जोडी येणार आहे. ट्रेलरमध्ये अभय आणि दीप्तीमधली जबरदस्त केमस्ट्री दिसत आहे. तसंच या चित्रपटातही संजय यांच्या प्रत्येक चित्रपटांप्रमाणे या चित्रपटांतही धम्माल डायलॉग्ज्स आहेत.


‘लकी’, जंपिग जॅक जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी


IMG-20190117-WA0007


संजय जाधव दिग्दर्शित लकी या धम्माल चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी त्यातील ‘कोपचा’ हे गाणेही दाखवण्यात आले. या गाण्यात अभिनेते जीतेंद्र आणि श्रीदेवी यांच्या हिम्मतवाला चित्रपटातील गाण्याला ट्रीब्यूट देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हे गाणं डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि गायिका वैशाली सामंत हीने गायलं असून बप्पीदांना सिनेसृष्टीत यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून’ लकी’ सिनेमाच्या कोपचा गाण्याव्दारे डेब्यू झालाय. हे गाणं अभिनेते जीतेंद्र कपूर यांना एवढं आवडलं की, त्यांनी लकी चित्रपटातील लकी हे मुख्य पात्र साकारणारा अभिनेता अभय महाजनसोबत चक्क 'कोपचा' गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’ने डान्सही केला. तर बप्पीदांनीही हे गाणं पुन्हा एकदा म्हणून दाखवलं. पाहा हा धम्माल व्हीडीओ
 

 

 


View this post on Instagram


 

 

We are Luckee for this ❤️ Thank you #jitendra sir!!! #kopchasong #jitendra #luckee #7feb


A post shared by Dreamers PR (@dreamers_pr) on
तुषार कपूरचं ‘लकी’शी खास नातं


या ट्रेलर लाँचला जीतेंद्र कपूर यांचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरही उपस्थित होता. यावेळी त्याने त्याचं लकी सिनेमाशी असलेलं कनेक्शन शेअर केलं. ‘गोलमाल सीरिजच्या सर्व सिनेमांमध्ये माझं नाव लकी असल्याने ‘लकी’ सिनेमाशी आता एक खास नाते निर्माण झालं आहे. सिनेमाचे निर्माते सूरज सिंग यांच्याशी माझा 16 वर्षांचा ऋणानुबंध आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत मी ‘सी कंपनी’ सिनेमामध्ये काम केलं होतं. त्यामूळे हा सिनेमा माझा होम प्रॉडक्शन असल्यासारखं मला वाटते आहे.'


IMG-20190117-WA0008


'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतआहे.