राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

बऱ्याचदा लोकांना वाटतं की, त्यांंच्या जन्मदिवसाची तारीख ही त्यांच्यासाठी भाग्यशाली नंबर असतो. पण असं नसतं. जन्मदिनांक हा मूलांक असतो ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे समजतं. पण तुमचा भाग्यशाली क्रमांक तुमच्या राशीवर अवलंबून असतो. तुम्हाला तुमचा भाग्यशाली नंबर अर्थात क्रमांक माहीत असेल तर तुम्ही तुमचं भाग्य अधिक बलवत्तर बनवू शकता आणि तुम्ही नव्या यशाच्या पायऱ्यादेखील पार करू शकता. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी कोणता क्रमांक लकी अर्थात भाग्यशाली असेल हे सांगणार आहोत.


मेष (21 मार्च - 19 एप्रिल)


Aries
या राशीचा ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या लोकांना आपल्या प्रत्येक कामाचा परिणाम हा अप्रतिम असावा असं वाटत असतं. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली क्रमांक आहे तो म्हणजे 1. तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाचा शुभारंभ करणार असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात 1 क्रमांकाला प्राधान्य द्या.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 9, 36, 13, 69, 53, 67


वृषभ ( 20 एप्रिल - 20 मे)


Taurus
या राशीचा स्वामी शुक्र असतो. त्यामुळे या राशीचे लोक हे जास्त रोमँटिक, तार्किक आणि दयाळू स्वभावाचे असतात. यांच्यासाठी 2 हा क्रमांक भाग्यशाली असतो. तुम्ही कोणतंही शुभकार्य करणार असाल तर त्यासाठी या क्रमांकाच्या तारखेचा नक्की मुहूर्त म्हणून विचार करू शकता.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 6, 9, 11, 35, 50, 57, 82


मिथुन (21 मे - 21 जून)


Gemini
या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे हे लोक अतिशय बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह विचारांचे असतात. या व्यक्तींचा क्रमांक 8 असतो. या क्रमांकामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवू शकता.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 3, 12, 18, 35,43,52 86


कर्क (22 जून - 22 जुलै)


Cancer
या राशीचे लोक हे चंद्राने प्रभावित असतात. या व्यक्तींमध्ये कमालीचा सिक्स सेन्स असतो. तसंच अशा व्यक्ती या साध्या आणि सरळ स्वभावाच्या असतात. या राशीच्या व्यक्तींसाठी 7 हा क्रमांक लकी असतो. त्यामुळे हा क्रमांक तुम्ही कोणतंही काम करताना लक्षात ठेवा. तुमचं बिघडत असलेलं काम नक्की पूर्ण होईल.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 2, 11,58, 24, 66,53


सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)


leo
या राशीचा स्वामी हा सूर्य आहे. या व्यक्ती कोणाही समोर वाकणं अजिबात सहन करू शकत नाहीत. या व्यक्ती अतिशय स्वाभिमानी आणि रागीट स्वभावाच्या असतात. यांच्यासाठी 1 हा क्रमांक भाग्यशाली आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या भाग्याचा दरवाजा नक्कीच उघडू शकता.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 4, 10,34,83,59


कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)


Virgo
या राशीचा स्वामी बुध आहे. या व्यक्ती खूपच दयाळू आणि तितक्यात नाजूकही असतात. प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये या व्यक्ती सावधानता बाळगतात. यांच्यासाठी 5 हा क्रमांक शुभ मानला जातो. हा क्रमांक या व्यक्तींसाठी नेहमीच गुडलक घेऊन येतो.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 3, 16, 90, 29, 80


तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)


Libra
या राशीचा स्वामी हा शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती या आदर्श व्यक्तिमत्व असतात असं म्हटलं जातं. या राशीच्या व्यक्तींसाठी 4 हा शुभ क्रमांक आहे. या व्यक्तींनी 6 क्रमांक लिहिलेल्या वस्तू जवळ ठेवल्या तरीही चालू शकतं. त्यांच्यासाठी हेदेखील शुभ असतं.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 4, 7, 20, 55, 35


वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)


Scorpio
या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांकडे भरपूर एनर्जी असते. तसंच या राशीचे लोक हे अत्यंत स्वतंत्र विचाराचे असतात. या राशीच्या लोकांसाठी 9 हा क्रमांक अत्यंत भाग्यशाली आहे. या दिवशी अथवा या क्रमांकाशी संबंधित तुम्ही कोणतंही कार्य केलंत तर तुम्हाला हे भाग्यशाली ठरेल.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 11,17,  27, 45, 53


धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)


Sagittarius
या राशीचा स्वामी हा गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींनी आपल्या डोक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात. यांच्यासाठी 3 क्रमांक हा गुडलक आहे. या दिवशी या व्यक्तींनी कोणतंही काम केलं तर त्या दिवशी ते काम पूर्ण तर होतंच शिवाय दुप्पट आनंदही मिळतो.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 5,15, 12, 21, 30


मकर (22 डिसेंबर - 19 जानेवरी)


Capricorn
या राशीचा स्वामी शनि असून या राशीच्या व्यक्ती अतिशय मजेशीर असतात. या राशीच्या व्यक्ती बहुतांश आत्मविश्वासी, महत्त्वाकांक्षी, नियमित, जबाबदारी असणाऱ्या आणि अतिशय विश्वसनीय असतात. या राशीच्या व्यक्तींचा भाग्यशाली क्रमांक हा 4 आहे. हा क्रमांक अर्थातच या व्यक्तींचं भाग्य फळफळवतो.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 1, 10, 13, 17, 22, 25


कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)


Aquarius
या राशीचा स्वामी हा युरेनस आहे. वायु तत्वाची ही रास असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती बऱ्यापैकी भित्र्या स्वभावाचे असतात. तर काही वेळा या व्यक्ती विद्रोहीदेखील असतात. या व्यक्तींचा भाग्यशाली क्रमांक हा 8 आहे. या क्रमांकाचा वापर करून या राशीचे लोक यशाच्या पायऱ्या पार करू शकतात.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 4, 13, 17, 40, 61


मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)


Pisces
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्ती समस्या सोडविण्यात हुशार असतात. या व्यक्ती आपल्याप्रमाणेच दुसऱ्यांकडूनही स्वतंत्र विचारांची आशा ठेवतात. यांचा भाग्यशाली क्रमांक 3 आहे.


तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक - 12, 27, 30, 34, 61


हेदेखील वाचा - 


जाणून घ्या जानेवारीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात


फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या


मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशाअसतात, जाणून घ्या