‘लुका छुपी’चं ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक आणि क्रितीची फ्रेश जोडी

‘लुका छुपी’चं ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक आणि क्रितीची फ्रेश जोडी

अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा चित्रपट ‘लुका छुपी’चं ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झालं. ट्रेलर येण्याआधीपासूनच या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याप्रमाणेच युट्यूबवर या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून कार्तिक आणि क्रितीच्या चाहत्यांचं मन जिंकून घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे. विशेषतः क्रितीला बराच चांगला प्रतिसाद अगदी सोशल मीडियावरदेखील मिळत आहे. ट्रेलरमध्ये क्रिती आणि आर्यनची दमदार केमिस्ट्री दिसून येत आहे. क्रितीचे चाहते सोशम मीडियावर तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. इतकंच नाही तर #kritisanon ट्रेंडिग आहे. सोशल मीडिया युजर्सने क्रितीचं खूपच कौतुक केलं आहे. कदाचित हा चित्रपट क्रितीच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे.

Subscribe to POPxoTV

हे ट्रेलर बघितल्यानंतर हा चित्रपट म्हणजे फुल एंटरटेनमेंट पॅकेज असल्याचं लक्षात येत आहे. यामध्ये पूर्ण फॅमिली ड्रामा आणि कॉमेडीचा तडका दिसतोय. लिव्ह इन रिलेशनशिपवर अतिशय वेगळ्या पद्धतीने भाष्य करण्यात आल्याचं प्रेक्षकांना दिसून येत असून अनोख्या अंदाजात कार्तिक आणि क्रितीला या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. तसंच क्रिस्पी आणि कॅची संवादामुळे हे ट्रेलर सध्या खूप गाजत आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आणि क्रितीव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, विनय पाठक आणि अपारशक्ती खुराणाच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातून अक्षयकुमारचं जुनं गाणं ‘अफलातून’चं रिक्रिएशन करण्यात आलं आहे. याचा ठेकाही प्रेक्षकांना ताल धरायला लावणारा आहे.


luka chuppi
ट्रेलरच्या एक दिवस आधी पोस्टर झालं प्रदर्शित


ट्रेलरच्या एक दिवस आधीच या चित्रपटाची तीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आली होती. कार्तिकने हे पोस्टर आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ‘पकडे जायेंगे या देंगे सबको चकमा’ असं कॅप्शन दिलं होतं. त्या दोघांच्याही चेहऱ्यावरील भावांवरून हा चित्रपट कॉमेडी असणार याची हिंट नक्कीच प्रेक्षकांना लागली होती. तर चित्रीकरणादरम्यानचे काही फोटोही याआधी क्रिती आणि कार्तिकने पोस्ट केलेले त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाले होते.


kartik kriti
1 मार्चला होणार प्रदर्शित


हा चित्रपट कॉमेडी शैलीतील असून दिनेश विजन प्रॉडक्शन अंतर्गत बनवण्यात आला आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरनं केलं आहे. लक्ष्मणने अनेक मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून ‘हिंदी मीडियम’ या इरफानच्या चित्रपटासाठी त्याने डीओपी म्हणून काम केलं होते. चित्रपटाच्या ट्रेलरमधून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवेल अशी अपेक्षा कार्तिक आणि क्रितीच्या चाहत्यांना वाटत आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक एक टीव्ही रिपोर्टरची भूमिका साकरत असून क्रिती एक मथुरामधील मुलगी असून दिल्लीला शिक्षणासाठी आलेली असते असं दाखवण्यात आलं आहे. परत मथुराला आल्यानंतर या चित्रपटाची कथा सुरु होते. क्रितीने याआधी 'बरेली की बर्फी'मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून कार्तिक हा तर सध्या हार्टथ्रोब ऑफ नेशन बनला आहे. 'सोनू की टिटू की स्वीटी' या चित्रपटाने कार्तिकला अनेक चित्रपट मिळवून दिले असून आता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना  1 मार्चला दिसणार  आहे. कार्तिक आता पुन्हा आपला जलवा प्रेक्षकांना दाखवणार का हे लवकरच कळेल.


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम


हेदेखील वाचा


सुष्मिता सेन आहे बॉयफ्रेंडची #lifeline, पाहा फोटो


रोमियो अकबर वॉल्टरमध्ये जॉन अब्राहमचा ‘हटके’ अंदाज


अभिनेत्री शिल्पा शिंदे चाहत्यांना बसणार झटका