तैमूर नाही करणार चित्रपटात काम, वाचा काय म्हणाले मधुर भांडारकर

तैमूर नाही करणार चित्रपटात काम, वाचा काय म्हणाले मधुर भांडारकर

तैमूर अजून शाळेतही जायला लागला नाही. त्याआधीच त्याच्या चित्रपटात काम करण्याच्या चर्चा होऊ लागल्या. गुड न्यूज या चित्रपटात आई करिनासोबत तैमुर काम करणार अशा चर्चा होत्या. त्याच्या मानधनाच्या आकड्याची चर्चा तर काय विचारायलाच नको. हे इतकं सगळं सुरु असताना चित्रपट दिग्दर्शक- निर्माते मधुर भांडारकर यांनी ‘तैमूर’ या नावाने चित्रपटाचे टायटल रजिस्टर केले असून तैमूर त्यात काम करणार असे म्हटले जात होते. पण मधुर भांडारकरांनी असे काहीच नाही सांगून तैमूरच्या चाहत्यांना मात्र निराश केले आहे.


taimur


प्रेमाच्या नात्याला लागलेला चित्रपट म्हणजे 'कलंक'


तैमूरच्या चित्रपटाशी काहीच संबंध नाही

मधुर भांडारकरांना जेव्हा ‘तैमूर’ या चित्रपटाविषयी विचारण्यात आले आणि या चित्रपटात सैफ आणि करिनाचा मुलगा तैमूर अली खान मुख्य भूमिकेत असल्याचे विचारल्यानंतर मधुर भांडारकरांनी त्या तैमूरचा या चित्रपटाशी काहीच संबंध नाही.  शिवाय तैमूर हे नाव मी रजिस्टर केलेले नाही असा खुलासा केला आहे. एका पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यावेळी त्यांना हा प्रश्न करण्यात आला. या व्यतिरिक्त त्यांनी यामध्ये अधिक स्पष्टता आणण्यासाठी माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये रोज कित्येक टायटलच्या नोंदी होत असतात. त्यात वेगवेगळी नावे आहेत. पण तैमुरचा त्याच्याशी काही संबंध नाही.


वेबसिरीज आल्या तरी या जुन्या मालिका हव्याहव्याशा


तेमूरने आईसोबत शूट केले दोन सीन


तर एकीकडे मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केले आहे की, तैमूरचा त्यांच्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. तर दुसरीकडे मात्र धर्मा प्रोडक्शनच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटात मात्र तैमूरने काम केले असून त्याने आई करिनासोबत दोन सीनही शूट केले आहेत असे म्हटले जात आहे. आता नेमकं काय खरं ते तर ‘गुड न्यूज’ हा चित्रपट आल्यानंतरच कळेल. तोपर्यंत मात्र आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. या चित्रपटात करिनासोबत अक्षय कुमार, दिलजीत दोसांज आणि किआरा अडवाणी आहे. हा चित्रपट रोमँटिक पटातील असून सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातून एका मोठ्या ब्रेकनंतर ती परत येणार आहे. तिने तैमूरच्या जन्मानंतर थोडा गॅप घेतला होता. त्यानंतर तिने 'वीरे दी वेडींग' हा चित्रपट केला. 

तैमूर करणार बॉलीवूडमध्ये एन्ट्री


तैमूर आताच झालाय स्टार


स्टार किड नेहमीच लक्ष वेधून घेतात. पण करिना आणि सैफच्या तैमूर इतके लक्ष आतापर्यंत कोणत्याच सेलिब्रिटी किडने वेधून घेतले नाही. तैमूरला पाहिल्यानंतर क्युट अशी प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही. त्याच्या क्युटनेसची चर्चा संपूर्ण जगभरात आहे तैमूर काय करतो? कुठे जातो? कोणत्या प्रकारातील कपडे घालतो याकडे अगदी बारकाईने पाहिले जाते. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी तैमूरसारखी हुबेहूब दिसणारी डॉल बाजारात आली. त्यालाही चांगलीच पसंती मिळाली.


तैमूरच्या नावे इन्स्टावर फॅन पेज


तैमूर स्टार झाला हे आम्ही तुम्हाला सांगितलचं. पण त्याच्या नावाने इन्स्टावर अनेक फॅनपेज आहेत. त्या फॅनपेजचे फॉलोवर्स पाहिले तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल. पापाराझी त्याला ठिकठिकाणी फॉलो करत असतात. त्याच्या नॅनीसोबत खेळताना असो की, करिनासोबत टाईम स्पेंड करताना असो त्याचे फोटो सगळीकडे क्लिक करत असतात.


(सौजन्य- Instagram)