नागिन - 4 साठी एकता कपूरने दिली या Ex-Couple ला ऑफर

नागिन - 4 साठी एकता कपूरने दिली या Ex-Couple ला ऑफर

एकता कपूरची नागिन या मालिकेचे पहिले तीन सीझन येऊन गेले आणि या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. इतकंच नाही तर यामधील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. या मालिकेने मौनी रॉयला बॉलीवूडची वाट मोकळी करून दिली तर अन्य कलाकारांनाही चांगली ओळख मिळवून दिली. आता या मालिकेचा चौथा भाग लवकरच सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण याआधी नागिन - 4 मध्ये लीड रोलसाठी कोणाला घ्यायचं याचा बराच शोध करण्यात आला. निया शर्मा आणि क्रिस्टल डिसुझा या दोघींचं नाव यासाठी फायनल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघींनी करिअरची सुरूवात एका मालिकेपासून केली ज्यामध्ये दोघी बहिणी होत्या.  त्यांच्यातील हीच केमिस्ट्री नागिनमधून दाखवणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण यामध्ये लीड रोलमध्ये नक्की कोण असणार असाही प्रश्न सगळ्यांना पडला होता. तर आता हा प्रश्न एकताने सोडवला आहे. ‘नच बलिये’ मधील कबीर सिंह जोडी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या विशाल सिंह आणि मधुरिमा तुली यांना विचारण्यात आलं आहे. 

विशाल सिंह आणि मधुरिमाला नागिन - 4 साठी विचारणा

विशाल सिंह आणि मधुरिमामधील नातं आता सर्वांनाच माहीत आहे. या दोघांंमध्ये अजिबातच मैत्री नाही. विशाल सिंहला लीड रोलसाठी विचाारण्यात आलं असून मधुरिमाला या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आलं आहे. मधुरिमा आणि विशाल यांनी या आधी चंद्रकांता या मालिकेतून काम केलं. यावेळी या दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं पण हे जास्त काळ टिकू शकलं नाही आणि आता तर या दोघांमधून विस्तवही जात नाही. पण कामाच्या बाबतीत या दोघांची केमिस्ट्री अफलातून आहे हेदेखील नेहमी दिसून आलं आहे. त्यामुळे या दोघांचं फेम नागिन - 4 ला नक्की मिळू शकेल असं एकता आणि तिच्या टीमला वाटत असावं त्यामुळे या दोघांनाही विचारण्यात आल्याचं समजत आहे. 

एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय

विशाल आणि मधुरिमाकडून अजूनही होकार नाही

या दोघांकडूनही अजून कोणताही होकार देण्यात आलेला नाही. तर विशाल आणि मधुरिमाबद्दल एकताकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ही जोडी जर या मालिकेत असेल तर नक्कीच प्रेक्षकांना ही मालिका बघायला आवडेल असा सध्या एक सूर लागलेला दिसून येत आहे. कारण या जोडीला सध्या नच बलियेमध्येही प्रचंड वाखाणण्यात येत आहे. विशालचा देसीपणा आणि मधुरिमाचा विदेशी टच असं हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच आवडत आहे. त्यामुळे जर ही जोडी कास्ट करण्यात आली तर नक्कीच ते प्रेक्षकांनाही आवडेल यात काही वाद नाही. 

सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा

नागिन - 4 चा प्रोमो प्रदर्शित

नागिन - 4 चा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोद्वारे केवळ याच गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे की, यावेळी नागिनमध्ये अशा नागांची कथा दाखवण्यात येणार आहे जे कायम एकदुसऱ्यासह राहतील. प्रत्येक सीझनमध्ये दोन नागिन दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्या भागात मौनी आणि अदा होती तर दुसऱ्या भागातही हीच जोडी होती. दरम्यान तिसऱ्या भागात सुरभी ज्योती आणि अनिता हसनंदानी यांची जोडी होती. आता चौथ्या भागात नक्की काय बघायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

#Naagin4 साठी एकता कपूर आहे परफेक्ट नागिनच्या शोधात

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.