महाराष्ट्राच्या शीतल पवारने मिसेस इंडिया स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

महाराष्ट्राच्या  शीतल पवारने मिसेस इंडिया स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

नवी दिल्लीमध्ये नुकतीच ‘मिसेस इंडिया वन इन दी मिलिअन 2020’ पार पडली. यात सहभागी झालेल्या भारतातील एकूण पाच हजार महिलांपैकी पाचशे महिला या स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. पुढे या पाचशे जणींमधून फक्त सत्तर जणी स्पर्धक म्हणून स्पर्धेसाठी निवडण्यात आल्या. ज्यातून फक्त चाळीस जणींची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. कौतुकास्पद गोष्ट ही की, या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्रातील जळगावच्या 'शीतल पवार'ने द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. पहिला क्रमांक जोधपूरच्या नितु भट्टला तर तृतीय क्रमांक चंदिगढच्या रागिणी कुलकर्णीला मिळाला आहे. सनराईझ व्हिजन इंटरटेंटमेंटतर्फे आयोजित ही स्पर्धा नवी दिल्लीतील एरोसिटी येथे घेण्यात आली होती. मुंबईत राहणाऱ्या आणि मुळच्या जळगावच्या असलेल्या शीतल पवारने हा पुरस्कार मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून तिचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

View this post on Instagram

@mrsindiamillion

A post shared by Sheetal Pawar (@thesheetalpawar) on

कोण आहे शीतल पवार -

शीतल पवार मुंबईतील एक नामांकित वकील असून ती मुळची जळगावची आहे. शीतलचं माहेर मालपूर येथील असून मठगव्हाळ तिचे सासर आहे. एवढंच नाही तर ती दहा वर्षांचा मुलाची आदर्श आईदेखील आहे. शीतलला लहाणपणापासूनच फिटनेस, ट्रॅव्हल आणि नृत्याची आवड आहे. ती एक उत्तम ब्लॉगर असून सोशल मीडियावर सतत प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारे लेखन करत असते. शीतल पवारने लग्नानंतर कुटुंब, करिअर आणि सामाजिक कार्याची धुरा सांभाळत वयाच्या 37 व्या वर्षी मिसेस इंडियाचा हा मानाचा द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी तिच्याकडे असलेलं अप्रतिम सौंदर्य आणि बुद्धी तिने पणाला लावली. जाणिवपूर्वक बुद्धीचा वापर करत तिने या स्पर्धेच्या टॅलेंट राऊंडमध्ये स्वतःचा एक ब्लॉग परिक्षकांसमोर प्रेंझेट केला. याचाच परिणाम असा झाला की तिची निवड या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकासाठी करण्यात आली. यातून ती केवळ सुंदरच नाही तर प्रतिभावंतदेखील आहे हे दिसून येतं. शीतल पवारने या पुरस्काराने फक्त तिच्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव त्यांनी गौरवले आहे. शीतल पवारचे हे यश महाराष्ट्रातील सर्व विवाहीत महिलांना पुढे येण्यासाठी आणि स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करत यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरत आहे

Instagram

मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धा -

मिसेस इंडिया वन इन दी मिलिअन ब्युटी स्पर्धा ही विवाहित महिलांच्या सौंदर्य आणि बौद्धिक क्षमतेचा पुरस्कार करणारी एक नामांकित स्पर्धा आहे. ज्यामध्ये विवाहित महिलांच्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि कौशल्याला चांगला वाव देण्यात येतो.1 नोव्हेंबर 2020 रोजी या स्पर्धेचा ग्रॅंड फिनाले न्यु दिल्लीतील एरोसिटीमध्ये पार पडला. ज्याची परिक्षक होती सेलिब्रेटी आदिती गोवित्रीकर आणि या स्पर्धेचे आयोजन केले होते डॉ.स्वाती दीक्षित आणि प्रशांत चौधरी यांनी. विजेत्यांची निवड रॅम्प वॉक, टॅलेंट आणि प्रश्नोत्तरे या राऊंडमधून करण्यात आली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध फॅशन डिझाईनर आणि एक्कोर इंडिया व दक्षिण एशियाच्या उपाध्यक्ष कॅरी हॅनफोर्ड आणि स्विस मिलेट्री चे अध्यक्ष अशोक साहनीदेखील उपस्थित होते. सेलिब्रेटी फॅशन फोटोग्राफर आणि एचडीसीआय काऊंसिलचे सदस्य रोहीत ढीगरा यांनी त्यांच्या कवितांनी या कार्यक्रमाला अधिक शोभा आणली. या कार्यक्रमासाठी पायल सिंह, अर्चना सिन्हा, भरत गौबा, उमेश दत्त, मानसी, अजय बिष्ट आणि लाली साहनी असे मान्यवर उपस्थित होते.