निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांना चक्क अंडरवर्ल्डकडून धमकी देण्यात आली आहे. फोनवरुन एक मेसेज करत त्यांच्याकडे 35 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आता अशी बातमी ऐकल्यानंतर धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण महेश मांजरेकरांसोबत नेमके काय घडले ते योग्य पद्धतीने जाणून घेणेही गरजेचे आहे. धमकीचा मेसेज आल्यानंतरही त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि धमकी देणाऱ्या त्या माणसाला पकडण्यास मदत केली. धमकी देणारा हा माणूस सध्या पोलिसांच्या ताब्यात असून नेमका प्रकार काय घडला ते आता आपण जाणून घेऊया.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: CBIला मिळाली नवी दिशा, बॉलिवूडवर निशाणा
धमकीचे मेसेज
साधारण 23 ते 25 ऑगस्ट या कालावधीत महेश मांजरेकर यांच्या खासगी क्रमांकावर सतत मेसेज येत होते. या मेसेजमध्ये अबू सालेमचा माणूस असल्याचे सांगत 35 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात येत होती. हा मेसेज सतत येत होता. शिवाय पैसे दिले नाही तर काहीतरी वाईट होईल असे देखील सांगण्यात आले. या व्यक्तिने त्याची ओळख 1993 च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील दोषी सांगून सध्या तो तुरुंगात असल्याचेही सांगितले. महेश मांजरेकरांनी थेट पोलीस स्टेशन गाठत या संदर्भात तक्रार केली. मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने लागलीच तपासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी याचा तपास घ्यायला सुरुवात केली. पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर त्यांनी पुढील पाऊल उचलायला सुरुवात केली.
असा लावला तपास
ज्या नंबरवरुन महेश मांजरेकर यांना मेसेज आले होते. तो नंबर पोलीस तपासाच्यावेळी बंद होता. पण त्याचे लोकेशन रत्नागिरी असल्याचे पोलिसांना कळाले होते. त्यानुसार मुंबईतून एक टीम रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये पोहोचली. हा नंबर मिलिंद तुळसकर नावाच्या व्यक्तिचा होता. त्या व्यक्तिचे घर शोधत त्याच्या मुसक्या आवळण्यात आला. त्याला मुंबईत आणण्यात आले. चौकशीनंतर ही गोष्ट समोर आली की, तुळसकर हा मुंबईतील धारावी भागामध्ये चहाची टपरी चालवतो. पण लॉकडाऊन झाल्यामुळे त्याचे दुकान बंद पडले. पर्यायी पैसे येणे बंद झाले त्यामुळे त्याने गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण गावातही काही काम नसल्यामुळे त्याला पैशांची गरज होती. युट्युबवर काही व्हिडिओ पाहात असताना अबू सालेमचा एक व्हिडिओ त्याने पाहिला आणि त्यावरुनच त्याला ही आयडिया सुचली. त्याने खंडणी मागायचे ठरवले. महेश मांजरेकर यांचा नंबर मिळवला. काही वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे असताना त्यांनी जिथे हा नंबर दिला होता. तेथूनच तुळसकरने नंबर मिळवला आणि खंडणीसाठी फोन केला. तुळसकर याची या पूर्वी कोणतीही क्राईम हिस्ट्री नाही. पण तरीही या गंभीर गुन्ह्यासाठी त्याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही माहिती PTI कडून देण्यात आली आहे.
मोहित मलिक त्याच्या आगामी मालिकेसाठी शिकतोय ही भाषा
पोलिसांचे मानले आभार
A Big Thank You to the @CPMumbaiPolice & The Anti-extortion cell for the swift action in getting the culprit in custody. Bravo @MumbaiPolice.
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) August 27, 2020
पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यामुळे महेश मांजरेकर यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. महेश मांजरेकर हे उत्तम अभिनेते असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.