अभिनेत्री माही गिलचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री  माही गिलचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूडची बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री माही गिलने अनेक वर्षांनंतर स्वतःबाबत एक खुलासा केला आहे. माहीच्या मते ती जरी बोल्ड भूमिका करत असली तरी खऱ्या खुऱ्या जीवनात मात्र ती तशी नाही. शिवाय ती तिच्या करिअरमधील भूमिकांबाबत असमाधानी असल्याची खंत तिने आता व्यक्त केली आहे. माहीने ‘देव डी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘साहेब बीबी और गॅंगस्टर’, ‘नॉट ए लव्ह स्टोरी’ अशा चित्रपटामधून बिनधास्त आणि हॉट लुकमध्ये दिसली होती. ज्यामुळे तिला अशाच प्रकारच्या भूमिका बॉलीवूडमध्ये ऑफर होत असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिला एकप्रकारच्या भूमिका मिळत  असल्यामुळे तिला तशाच प्रकारच्या भूमिका कराव्या लागत असल्याची तिची खंत आहे. 

Instagram

काय आहे माहीच्या मनात

माहीच्या मते तिला नेहमी सेक्सी आणि बार गर्लच्या भूमिकांसाठी विचारण्यात येतं. कोणत्याही चित्रपटात असा रोल असेल तर आधी तो विचारण्यात येतं. तिला आता बॉलीवूडमध्ये  जवळजवळ दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र असं असूनही तिला यापेक्षा वेगळ्या भूमिका ऑफर झालेल्या नाहीत. माहीच्या मते बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अभिनय येत नसूनही चांगल्या आणि प्रमुख भूमिका मिळतात. माझ्या वाट्याला मात्र एकाच साच्यातील भूमिका कराव्या लागल्या आहेत. ज्यामुळे माहीला नक्कीच दुःख होत आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात वेगळ्या भूमिका करण्याची संधीच कधी मिळाली नाही. माहीच्या मते तिच्याकडे असलेल्या अभिनयाच्या जोरावर ती कोणत्याही  भूमिकाला न्याय देण्यास तितकीच सक्षम आहे. मात्र बॉलीवूडने तिला अशा भूमिकांची संधीच आजवर दिलेली नाही. बॉलीवूडमध्ये काम करण्याची पहिली संधी तिला देव डी चित्रपटातून मिळाली होती. हा चित्रपट तिला एका बर्थ डे पार्टीमुळे मिळाला होता. या पार्टीत ती सलग चार तास डान्स करत होती आणि ते पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी तिला तो रोल ऑफर केला होता. मात्र त्यानंतर तिला अशाच प्रकारच्या भूमिका कराव्या लागल्या. माहीला आता कौटुंबिक भूमिकादेखील करायच्या आहेत. ज्यासाठी ती बार गर्ल अथवा तिने पूर्वी केलेल्या भूमिका स्वीकारत नाही आहे. याशिवाय तिने याबाबत तिच्यासोबत घडलेली एक घटनादेखील शेअर केली. 

Instagram

माहीसोबत काय घडलं होतं एका शूटिंग दरम्यान

काही दिवसांपूर्वी माही काम करत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक भयंकर प्रकार घडला होता. माही मुंबईत एका चित्रपटाचं शूटिंग करत होती. ज्यामध्ये शूटिंग सुरू असताना अचानक काही गुंड आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास आणि मारामारी करण्यास सुरूवात केली. माहीच्या मते तिच्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये तिला असा पहिल्यांदाच अनुभव आला. त्यामुळे तिने आणि तिच्या टीमने याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली. तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्या गुंडांना लगेच शोधूनही काढलं. त्यामुळे माहीच्या मते अशा घटना लपवून न ठेवता त्यांना जगासमोर आणून न्याय मागणं गरजेचं आहे.

माही गिलचा आगामी चित्रपट

माही गिल लवकरच फॅमिली ऑफ ठाकूरगंज या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात माहीसोबत जिमी शेरगील, सौरभ शुक्ला, पवन मल्होत्रा, सुप्रिया पिळगांवकर आणि नंदिश संधुदेखील असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज झा करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय सिंह राजपूत करत आहेत. 19 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा 

#BBM चा स्पर्धक पुष्कर जोगच्या नात्यात सई लोकुरमुळे आला दुरावा

विशू, दगडूनंतर आता प्रथमेशला मिळाली नवी ओळख

म्हातारपणातही बॉलीवूड स्टार्स दिसत आहेत ‘हॉट’, फोटो झाले व्हायरल

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम