बनावट दादासाहेब फाळके पुरस्कारामुळे 'ही' अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

 बनावट दादासाहेब फाळके पुरस्कारामुळे 'ही' अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

बिग बॉस 13 नुकतंच पार पडलं. या पर्वातील स्पर्धक माहिरा शर्माला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शोमधून बाहेर पडल्यावर मात्र माहिरा एका मोठ्या वादात सापडली आहे. काही दिवसांपूर्वीच माहिराने शेअर केलं होतं की तिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. बिग बॉसमधील सर्वात फॅशनेबल स्पर्धक म्हणून तिला हा पुरस्कार मिळाल्याचं तिचं म्हणणं आहे. मात्र आता हा पुरस्कार खोटा असल्याचं उघड झालं आहे. ज्यामुळे माहिराने तिच्या प्रसिद्धीसाठी हा बनावट पुरस्कार तयार केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे हे सर्व प्रकरण

दादासाहेब फाळके सारखा महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्याने माहिराचे चाहते नक्कीच आनंदी झाले होते. मात्र हा पुरस्कार बनावट असल्याचं उघड झाल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. DPIFF च्या टीमने हा पुरस्कार बनावट असल्याचं जाहिर केलं आहे. त्यांच्या मते प्रसिद्धीसाठी माहिराने हा पुरस्कार तयार केला आहे. माहिराने मात्र याबाबत फसवणूकीचा दावा केला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या बातमीमागील सत्य जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. DPIFF च्या टीमनुसार चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल माहिराने त्यांची जाहिर माफी मागणी मागावी. शिवाय तिने असं न केल्यास तिच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते असंही म्हटलं आहे. यावर माहिराने सोशल मीडियावर तिचं मत व्यक्त केलं आहे. 

माहिराने मांडली तिची बाजू

माहिराने याबाबत तिचं मत सोशल मीडियावर स्पष्ट केलं आहे. माहिराच्या मते दादासाहेब फाळकेच्या टीमनेच हा पुरस्कार जाहिर केला होता. ज्यामुळे तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे निरर्थक आणि चुकीचे आहेत असं तिचं  म्हणणं आहे. माहिराने सोशल मीडियावर शेअर केलं आहे की, तिला दादासाहेब फाळके टीमच्या प्रबल मेहता यांच्यातर्फे एक मेल आला होता. या मेलमध्ये त्यांनी माहिराला बिग बॉसमधील फॅशनेबल स्पर्धक म्हणून दादासाहेब पुरस्कार जाहिर केल्याचं लिहीलेलं होतं.हा मेल माहिराच्या ऑफिशिअल अकांऊटवर आला होता. तिच्या मॅनेजरने मेल पाबून तिला यासाठी  मीडियाला बाईट देण्यासाठी सांगितलं. सहाजिकच हा मेल आल्यामुळेच सोशल मीडियावर मी माझ्या चाहत्यांसाठी ही खुशखबर शेअर केली होती. ज्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. याबाबत सत्य जाणून घेतल्याशिवाय माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. कारण काहिही असलं तरी यामुळे बनावट पुरस्काराचं हे प्रकरण समोर आलं आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला निरोप देताना कलाकार झाले भावूक

बॉलीवूडमध्ये ठरले अपयशी पण दुसरे करिअर निवडून झाले स्टार सेलिब्रिटी

हिंदी रियालिटी शो वर मराठी स्पर्धकांंचा डंका