सध्या टीव्हीवरील मराठी सीरियल तुला पाहते रे मध्ये फारच रंजक आणि जलद घडामोडी घडत आहेत. एका प्रेमकथेपासून सुरूवात झालेल्या कथेने आता बराच लांबचा पल्ला गाठला आहे. मध्यंतरी काहीशी रेंगाळल्यासारखी वाटलेली ही सीरियल आता मात्र रंजक वळणावर येऊन थांबली आहे. आता या प्रेमकथेचं रूपांतर सूड कथेत होत असल्याचं चित्र आहे. विक्रांतने सुरू केलेला भूतकाळातील खेळ आता ईशा म्हणजेच राजनंदिनी संपवणार का?
राजनंदिनी म्हणून अभिनेत्री शिल्पा तुळसकरची एंट्री झाल्यापासून सीरियलमधल्या विक्रांत उर्फ गजा पाटीलच्या पूर्वायुष्यातील एक एक गोष्टी समोर येत आहेत. ईशासमोर आता तिचा पुर्नजन्म उलगडत असल्याच या सीरियलमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे एकीकडे ईशा आपल्या पुर्नजन्माबाबत संभ्रमात आहे तर दुसरीकडे समोर येतोय विक्रांतचा खरा चेहरा. अनेक कारस्थान करूनही राजनंदिनी आणि सरंजामेंची प्रोपर्टी आपल्या नावावर करून घेण्यात विक्रांतला यश आलेलं नाही. शेवटी विक्रांतने राजनंदिनी म्हणजेच आताची ईशा हीचा खून प्रोपर्टीसाठी केल्याचं ईशाला कळणार आहे.
भूतकाळात विक्रांतचा खरा चेहरा आणि त्याची कारस्थान एकेक करून आता राजनंदिनी समोर उलगडत आहे. राजनंदिनीचा विश्वास पुन्हा एकदा जिंकून जालिंदरवर दादासाहेबांच्या खुनाचा आळ टाकण्यात विक्रांत यशस्वी होतो. पण विक्रांतच्या दुर्दैवाने राजनंदिनी जालिंदरला तुरूंगात जाऊन भेटते. या भेटीत जालिंदर विक्रांत उर्फ गजेंद्र पाटीलची सर्व कारस्थान राजनंदिनीला सांगतो. ज्यामध्ये शिरपूरकरची हत्या ते दादासाहेबांची हत्या इथपर्यंत सगळं तो राजनंदिनीला सांगतो. विक्रांतचा तिच्या आयुष्यात येण्याचा खरा हेतू आता राजनंदिनीला कळला आहे. तसंच जालिंदर राजनंदिनीला विक्रांतपासून सावध राहण्याचा सल्ला देतो. आपल्या आयुष्यात आता एकच ध्येय राहिलं आहे ते म्हणजे गजा पाटील उर्फ विक्रांतचा बदला घेणं हेही तो राजनंदिनीला सांगतो.
या भेटीनंतर राजनंदिनी पुन्हा ऑफिसमध्ये येते आणि आपल्या दादासाहेबांचा विक्रांत काढून टाकलेला फोटो तिथे पुन्हा लावते. यावेळी तिला दादासाहेबांनी दिलेला सल्लाही आठवतो. आता विक्रांतच सर्व सत्य आणि बदलेला स्वभाव कळल्यानंतर राजनंदिनीनेही पाऊल उचलायला सुरूवात केली आहेत. पण विक्रांतला अडवण्यात तिला यश येणार का?
या वीकेंडला प्रेक्षकांना या सीरियलचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये विक्रांत राजनंदिनीची हत्त्या करण्याचा सीन आहे.
View this post on Instagram
तर दुसऱ्या एका टीझरमध्ये ईशा कोणालाही न सांगता आपल्या माहेरी येते असं दाखवण्यात आलं आहे. एकीकडे ईशाचे आईबाबा तिच्या अशा अचानक येण्याने चिंतीत आहेत तर दुसरीकडे ईशाला काहीच कळत नाहीये की ती नेमकी कोण आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचं आहे की, राजनंदिनीने पाऊल उचलण्याआधीच विक्रांत तिचा काटा काढण्यात यशस्वी होणार का? आपल्या पुर्नजन्मातील सत्य कळल्यावर ईशा काय करणार? आपल्या हत्त्येचा बदला ईशा विक्रांतशी लढून घेणार का? हे सर्व पाहण्याची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
फोटो सौजन्य - Instagram
हेही वाचा -
बिग बॉस मराठी सिझन 2 ‘या’ तारखेला होणार सुरू
तू माझा.. मीच तुझी.. सख्या 'जिवलगा'