सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

टेलिव्हिजन मालिकांमध्ये कधी काळी आदर्श सुन, पत्नी आणि आईची भूमिका साकारणारी जुही परमार सध्या या माध्यमापासून दूर आहे. मात्र ती तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून नेहमीच संपर्कात असते. एवढंच नाही तर वेळोवेळी तिच्या चाहत्यांना ब्युटी टिप्सदेखील देत असते. ती तिच्या युट्यूब चॅनेलवरून या टिप्स शेअर करत असते. काही महिन्यापूर्वीच जुहीने तिच्या सौंदर्याचं रहस्य चाहत्यांसमोर खुलं केलं होतं. ज्यात ती वापरत असलेली होममेड क्रिम घरीच कशी तयार करायची हे तिने शेअर केलं होतं. तिचं हे होममेड क्रिम त्वचेला उजळ करण्यासाठी, सैल पडलेली त्वचा टाईट करण्यासाठी आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी अतिशय उत्तम आहे. शिवाय यात तिने सर्व ऑर्गेनिक घटकांचा वापर केला आहे. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या या क्रिचे कोणतेही दुष्परिणाम त्वचेवर होत नाहीत. तेव्हा जाणून घेऊ या जुहीने हे क्रिम कसं तयार केलं आहे. 

जुही परमारच्या होममेड क्रिमचं सिक्रेट

जुहीने तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ही क्रिम तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, कृती  आणि वारण्याची पद्धत शेअर केली आहे. तिने या पोस्टसोबत शेअर केलं होतं की, " मला घरातच ऑर्गेनिक गोष्टी तयार करण्याची आवड आहे. शिवाय स्कीन केअर रूटिन हे आपल्या  जीवनाचा एक अविभाज्य भाग  आहे. कारण प्रत्येकाला चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. यासाठीच मी तुमच्यासोबत एक केमिकल फ्री DIY फेस क्रिम शेअर करत आहे. ज्यामुळे तुमची त्वचा ब्राईट, टाईट आणि स्मूथ होईल. ही क्रिम माझ्या डेली स्किन केअर रूटिनचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हीदेखील ही क्रीम नक्कीच ट्राय करू शकता. 

होममेड क्रिमसाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची पद्धत -

ऑर्गेनिक फेसपॅकसाठी लागणारे साहित्य -

 • दोन ते तीन चमचे लाल मसूर डाळ
 • गुलाबपाणी
 • दोन चमचे बदाम तेल अथवा ऑलिव्ह ऑईल
 • दोन चमचे ग्लिसरिन
 • दोन चमचे कोरफडाचा गर


होममेड क्रिम तयार करण्याची पद्धत -

 • मसूर डाळ भिजेल इतपत गुलाब पाणी त्यात मिसळा आणि पाच ते सात तास ती गुलाबपाण्यात भिजू द्या
 • डाळ चांगली भिजल्यावर त्यात पाणी न टाकता ती वाटून घ्या
 • एका गाळणीने हे मिश्रण गाळून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा
 • मसूरडाळीचे दोन चमचे मिश्रण घ्या आणि त्यात बदाम अथवा ऑलिव्ह ऑईल, ग्लिसरिन, कोरफडाचा गर टाकून मिश्रण एकजीव करा
 • मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीच याची काळजी घ्या
 • मिक्स केल्यामुळे एखाद्या क्रिमप्रमाणे तयार ही पेस्ट एखाद्या हवाबंद बरणीत भरून ठेवा. तुम्ही होममेड ऑर्गेनिक पेस्ट तयार आहे.
 • ही क्रीम दहा ते पंधरा दिवस टिकू शकते. जास्त टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवा

कसा करावा वापर -

चेहरा स्वच्छ करा आणि पुसून घ्या. त्वचेवर या क्रिमचे काही थेंब लावा आणि बोटांच्या मदतीने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. तुम्ही रात्रभर ही क्रीम चेहऱ्यावर ठेवू शकता. सकाळी आणि संध्याकाळी वापरण्यासाठी ही होममेड फेसक्रीम अगदी परफेक्ट आहे. ही क्रिम फक्त नॉर्मल अथवा कोरड्या प्रकारची त्वचा असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ज्यांची त्वचा तेलकट प्रकारची आहे त्यांनी ही क्रिम वापरू नये.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेलं हे जुही परमारचं ब्युटी सिक्रेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही घरी ही क्रीम तयार केली का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे असेच आणखी अनेक DIY उपाय करण्यासाठी आमचे इतर लेख जरूर वाचा.

Beauty

Manish Malhotra Cinnamon Ginger Night Gel

INR 945 AT MyGlamm