2020 मध्ये रिंकूची सैराट सुरूवात

2020 मध्ये रिंकूची सैराट सुरूवात

सैराट आणि कागर हे चित्रपट दिल्यानंतर 2020 मध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू करणार आहे जबरदस्त सुरूवात. रिंकूच्या आगामी मेकअप चित्रपटामध्ये ती दिसणार आहे हटके भूमिकेत. मुख्य म्हणजे रिंकूच्या तिसऱ्या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिंकूही मराठीतली पहिली अभिनेत्री आहे जिला करिअरच्या सुरूवातीपासून सर्व लीड रोल मिळाले आहेत. या चित्रपटाचं टीझर आल्यापासूनच याबद्दल जबरदस्त चर्चा आहे. कारण या चित्रपटात पहिल्यांदाच रिंकूचा मॉडर्न अवतार पाहायला मिळत आहे.

मेकअपचं इंटरेस्टींग ट्रेलर

रिंकू या चित्रपटात पूर्वीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचं ट्रेलर पाहायल्यावर उत्सुकता नक्कीच वाढते. कारण एकीकडे रिंकू पारंपारिक लुक तर दुसरीकडे मॉडर्न अवतारात दिसते. ट्रेलरची सुरूवात गंमतीशीर असली तरी शेवट मात्र गंभीर दाखवण्यात आल्याने कथेत ट्वीस्ट असल्याचं दिसतंय. पण या चित्रपटातही रिंकूच्या अभिनयात थोडी सैराटची झलक दिसते.

या चित्रपटात पहिल्यांदाच रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे गणेश पंडित यांनी. दिग्दर्शक म्हणून गणेश पंडित यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

लक्षवेधी चिन्मय उदगीरकर

या चित्रपटाच्या पोस्टरपासून रिंकूची चर्चा असली तरी ट्रेलरमध्ये मात्र लक्ष वेधून घेतो तो अभिनेता चिन्मय उदगीरकर. या चित्रपटात डॉक्टरची भूमिका करत आहे. या भूमिकेत तो खूपच फ्रेश वाटत आहे. नुकतीच चिन्मयची टीव्हीवरील मालिका घाडगे अँड सून ने निरोप घेतला आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्ससाठी हा सिनेमा नक्कीच ट्रीट ठरेल. एवढंच नाहीतर या चित्रपटासोबतच चिन्मयचा 'वाजवूया बँड बाजा' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तरुणांना आकर्षित करणारा 'वाजवूया बँड बाजा'चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडेल असा असून मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला आपल्या करंट अफेअरच्या आठवणींत रमायला भाग पडेल याची निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना खात्री आहे.

बिग बींनी केलं ट्रेलर शेअर

मेकअपचं ट्रेलर रिलीज होताच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ते शेअर केलं. नागराज मंजुळेंच्या आगामी झुंडमध्ये बिग बी आणि रिंकू राजगुरू एकत्र दिसणार आहेत. हा नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा आहे. या सिनेमात पुन्हा एकदा रिंकू आणि आकाश ठोसर यांची जोडी दिसेल.

आता पाहूया रिंकूचा मेकअप प्रेक्षकांना आवडतो की नाही.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.