रिलेशनशीप Confirmed! अर्जुन कपूरला मलायकाने दिले अनोखे बर्थडे गिफ्ट | POPxo

रिलेशनशीप Confirmed! अर्जुन कपूरला मलायकाने दिले अनोखे बर्थडे गिफ्ट

रिलेशनशीप Confirmed! अर्जुन कपूरला मलायकाने दिले अनोखे बर्थडे गिफ्ट

बी टाऊनमध्ये लिंकअप, ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा सुरुच असतात. मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपबद्दलही जोरदार चर्चा सुरु होती. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर यांच्या रिलेशनशीपवर सगळ्यांनीच शिक्कामोर्तब केले होते. पण या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल उघड उघड सांगितले नाही. पण आता अर्जुन कपूरच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधत मलायकाने त्याला असं अनोख गिफ्ट दिल आहे की, ज्यामुळे या दोघांमधील रिलेशनशीप Confirmed झाले आहे.

रोहमन शॉ आणि सुश्मिता सेनचं झालं ब्रेकअप... रोहमनने केली पोस्ट 

फोटो शेअर करुन दिलं बर्थडे गिफ्ट

Instagram
Instagram

आज अर्जुन कपूरचा काल 32वा वाढदिवस होता. त्याला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्याला दिलेल्या एक शुभेच्छेने मात्र लोकांच्या भुवया उंचावल्या. या शुभेच्छा आणखी कोणी नाही तर मलायका अरोराने अर्जुन कपूरला दिल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये वेगळं ते काय? वेगळी आहे ती फोटो कॅप्शन मलायकान शुभेच्छा देताना अर्जुन कपूरसाठी काही खास शब्द वापरले आहेत त्यामुळेच त्यांच्या नात्यावर आता मोहोर बसली आहे. आता तुम्हीच ही फोटो कॅप्शन वाचा म्हणजे तुम्हालाच कळेल.

पहिल्यांदाच केली पब्लिक पोस्ट

Instagram
Instagram

मलायका-अर्जुनला खूप लोकांनी खूप ठिकाणी एकत्र पाहिले असले तरी या दोघांनी कधीच उघड उघड चर्चा या विषयावर केली नाही. त्यामुळे या दोघांमध्ये काय शिजतयं हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. अर्जुन कपूर मलायकापेक्षा तब्बल 12 वर्षांनी लहान आहे. त्यामुळेच या दोघांमध्ये खरचं काही आहे का? यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. पण त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्तही काही आहे हे कन्फर्म झाल होतं. मलायका आणि अर्जुन इतरवेळी कधीच त्यांच्या सोशल मीडियावरुन एकत्र असलेले फोटो शेअर करत नाही. पण काल पहिल्यांदा तिने पब्लिक पोस्ट केली आहे. यात तिने त्याच्या डार्लिंग अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवूडमधील हे 10 कलाकार आता दिसतात असे

न्यूयॉर्कमध्ये केला बर्थडे सेलिब्रेट

Instagram
Instagram

अर्जुनने त्याचा यंदाचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा केला आहे. वाढदिवसाच्या आधी या दोघांना एकत्र एअरपोर्टवर टिपण्यात आले होते. त्यावेळी मलायका लाल रंगाच्या स्टायलिश जॅकेट आणि पँटमध्ये होती. तर अर्जुन काळ्या रंगाच्या टिशर्टमध्ये होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यू यॉर्कला गेले होते. 

अरबाज खानसोबत म्हणून घेतला घटस्फोट

Instagram
Instagram

बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी कपल आहेत. जे पावर कपल म्हणून ओळखले जातात. त्यापैकीच एक होते. अरबाज आणि मलायका यांनी 1998 साली लग्न केले. लग्नाच्या 19 वर्षाच्या संसारानंतर या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाज खानला काहीही काम नसल्यामुळे अरबाजसोबत मलायकाचे खटके उडत होते. म्हणूनच तिने त्याच्याशी अखेर घटस्फोट घेतला. तर आणखी एक कारण असे समोर आले की, घटस्फोटाआधीच मलायकाचे अर्जुनसोबत असलेले अफेअर अरबाजला कळले होते. म्हणूनच या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

 

काहीच दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. आता या पोस्टनंतर आणि त्यांच्या या Vaccy फोटोनंतर मात्र आता त्यांचा वेडिंगचा शिनेमा लवकरच सुरु होणार का ते पाहायला हवे. या दोघांव्यतिरिक्त अनेक बी टाऊन सेलिब्रिटी यंदा विवाहबंधनात अडकणार असे देखील कळत आहे. 

जेव्हा एकता कपूर तुषारवर रागावून करते पोलिसांना फोन