मलायकाला सतावतेय म्हातारी होण्याची भीती, लवकर लस शोधा म्हणाली मलायका

मलायकाला सतावतेय म्हातारी होण्याची भीती, लवकर लस शोधा म्हणाली मलायका

बॉलीवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायकाला म्हातारी होण्याची भीती सतावतेय असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही. पण खरंच हे मलायका स्वतःच म्हणाली आहे. मलायकाला मागच्या आठवड्यात कोरोना झाला असल्याचं समोर आलं. तिने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आणि आपण डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार घरातच क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत असल्याचंही सांगितलं होतं. त्यानंतर अनेक जणांनी तिला तब्बेत जपण्याचा सल्ला दिला आणि सोशल मीडियावर तिला तब्बेत लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छाही दिल्या. आता मात्र मलायकाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये असा मजेशीर स्टेटस ठेऊन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बिग बॉस 14' चा ग्रँड प्रिमियर होणार 'या' दिवशी, लवकरच कळणार थीम

कोरोनामुळे मलायका झाली हवालदिल

Instagram
View this post on Instagram

🙏😷

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

कोरोनाचा प्रादूर्भाव जगभरात वाढत आहे आणि भारतातही या रोगाने थैमान घातलं आहे. या रोगाच्या विळख्यातून गरीब श्रीमंत कोणीही सुटलेला नाही. तर अनेक जण या रोगामुळे आपला जीव गमावत आहेत.  काहींना याचा उपचार वेळेत न मिळाल्याने तर काहींना अति त्रास झाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनादेखील कोरोना झाला आहे. मलायका सध्या एका डान्स शो मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. तिला गेल्या आठवड्यात कोरोना झाल्याचे निदान झाले असून तिला त्याची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र तरीही तिने स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ती सध्या औषध घेत आहे आणि काळजीही घेत असल्याचं तिने स्पष्ट केले होते. तर काही तासांपूर्वी मलायकाने शेअर केलेल्या स्टोरीने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कोणीतरी लस शोधून काढा रे बाबांनो, नाहीतर मी म्हातारी होईन’ (कोई वॅक्सिन निकाल दो भाई, नही तो जवानी निकल जाएगी) अशा स्वरूपाचं मजेशीर स्टेटस ठेवलं आहे. मलायका अरोरा ही सर्वात फिट अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. मलायका नेहमी योगाने स्वतःला फिट ठेवते. त्यामुळे तिचं वय कळून येत नाही. वास्तविक मलायका ही 44 वर्षांची असून तिच्या फिटनेसमुळे तिचं वय लपलं जातं. पण आता जर वेळेवर ही लस आली नाही तर आपणही म्हातारे दिसायला लागू अशा स्वरूपाची मजेशीर पोस्ट मलायकाने केली आहे. त्यामुळे ‘फॉरेव्हर यंग मुन्नी’ला आता म्हातारपणाची भीती वाटायला लागली की काय अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'या' मराठी चित्रपटाला पुरस्कार

लवकरच बरी होईन हा विश्वास

कोरोना झाल्यानंतर मलायकावर सध्या घरीच उपचारग सुरू आहेत. यामधून आपण लवकरच बरे होऊ असा विश्वास मलायकाने व्यक्त केला आहे. तिला कोणतीही लक्षणं दिसून इतरांना त्रास होऊ नये यासाठी तिने क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अर्जुन कपूरलाही कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या दोघांमधील नातं पुन्हा एकदा समोर आलं आहे. अर्थात दोघांनीही अधिकृतरित्या काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केलं आहे. मात्र लग्नाबाबत कोणतीही माहिती दोघांनीही दिलेली नाही. लवकरच दोघांचीही तब्बेत बरी व्हावी यासाठी त्यांचे चाहते आता प्रार्थना करत आहेत. तर लवकरच आपण सेटवर परत येऊ अशी आशाही मलायकाने व्यक्त केली आहे.

अनुष्का शर्माचा नवा फोटो विरुष्काच्या फॅन्समध्ये होत आहे वायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक