मराठी गाण्यावर थिरकतानाचा मलायकाचा तो जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठी गाण्यावर थिरकतानाचा मलायकाचा तो जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठी गाणी आहेच अशी की, ती भल्या भल्यांना नाचायला भाग पाडतात. मराठी गाण्यांची भूरळ हिंदी कलाकारांनाच नाही तर परदेशातही आहे. अशाच एका मराठी गाण्यावर गणपती डान्स करतानाचा मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एका रिअॅलिटी शो दरम्यान मलायका अरोराला एका गाण्यावर डान्स करण्याची इच्छा झाली आणि ती पदर खोचून या गाण्यावर नाचू लागली. मलायकाचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे. कारण सगळ्या सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली आहे. हा शो संपून आता दोन महिने झाले आहेत. पण तरीही आता  हा डान्स व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं काय खास आहे ते जाणून घेऊया.

माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, अनामिकाचा घेणार शोध

मराठी गाण्यावर थिरकली मलायका

सध्या इंडियाज बेस्ट डान्सर हा डान्सिंग रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या रिअॅलिटी शोच्या परिक्षकाच्या खुर्चीवर मलायका असून ती एक उत्तम डान्सर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. एका एपिसोड दरम्यान तिने मस्त बनारली साडी आणि ऑक्सडाईज ज्वेलरी परिधान केली आहे. नाकात नथ घातल्यामुळे मलायका या रुपात मराठमोळी मुलगीच दिसत आहे. सेटवर आणलेल्या गणपतीसाठी खास लेझीम म्युझिक लावण्यात आले. त्यावेळी या शोची अँकर भारतीने तिला नाचण्याचा आग्रह केला. त्यावेळी तेथे सुप्रिया पिळगावकरही होत्या. त्यांनी मलायकाला स्टेजवर बोलावून असा काही डान्स केला की, सगळेच थक्क झाले. मलायका देखील पदर खोचून या गाण्यावर बेभान होऊन नाचली. हाच तो व्हिडिओ असून मलायकाच्या डान्समुळे हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.

मलायकाची बनारस साडी

मलायकाचा डान्स जितका आकर्षक आहे. त्याहून अधिक आकर्षक मलायकाची साडी दिसत आहे. मलायकाची ही बनारसी साडीही अनेकांना आवडली आहे. मलायकाची गुलाबी आणि लाल रंगाची ही साडी फारच सुंदर असून त्याला सोनेरी रंगाची झटा आहे. त्याला थोडा वेगळा लुक देण्यासाठी या साडीवर तिने सिल्व्हर ऑक्सडाईज ज्वेलरी घातल्या आहेत. ज्यामध्ये चोकर सेटपासून महाराणी हार अशी ज्वेलरी तिने या साडीवर घातली आहे. ती या साडीमध्ये खूपच सुंदर आहे. मलायकाचे या रिअॅलिटी शोमधील सगळेच लुक फार सुंदर असतात. त्यामुळे तिचे अनेक लुकही व्हायरल होतात. 

गायिका हर्षदीप कौर झाली आई, मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर

मलायका आहे खूपच सुंदर डान्सर

मलायका एक उत्तम डान्सर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मलायकाची अनेक आयटम साँग्स प्रसिद्ध आहे. छैय्या छैय्या असू दे किंवा मुन्नी बदनाम मलायकाने तिचे वेगळेपण तिच्या डान्समधून सिद्ध केले आहे. आजही ती तिच्या फिटनेससाठी बरेच काही करताना दिसते. पिलाटेझ असू दे किंवा पावर योगा ती तिच्या फिटनेससाठी बऱ्याच गोष्टी करते. तिचा डाएट आणि फिटनेस जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. मलायकाने चाळिशी पार केली असली तरी ती आजही तितकीच सुंदर दिसते. दोन मुलांची आई असलेली मलायका तिच्या फिगरसाठीच ओळखली जाते. 

अर्जुनसोबत लिव्ह इन मध्ये

मलायका अरोरा सगळ्यात जास्त चर्चेत आली ते अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे. तिने अरबाज खानसोबतचा एवढ्या वर्षांचा संसार केवळ अर्जून कपूरसाठी मोडला असे देखील सांगितले जाते. या दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. ती दोघंही बरेचदा बाहेर आपल्या सुट्ट्या मजेत घालवताना दिसतात.

 

सध्या तरी मलायकाचा हा डान्स व्हायरल होत असून तिच्या सुंदर साडीसाठी आणि डान्स मुव्हजसाठी हा डान्स बघायला हवा. 

बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच करतेय लग्न