बॉलीवूडच्या सेलेब्सच्या लाईफमध्ये सध्या काही ना काही इंटरेस्टींग गोष्टी सुरू आहेत. कोणी लग्न करतंय, कोणी लग्न करण्याच्या तयारीत आहे, तर कोणाकडे गुड न्यूज आहे. याच दरम्यान मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबतही चर्चा आहे. काही काळापूर्वी हे दोघं लपूनछपून भेट होते पण काही दिवसांपासून आता हे दोघंही बिनधास्त एकत्र फिरताना आणि रोमान्स करताना दिसत आहेत. एकीकडे या दोघांचं लग्न 19 एप्रिलला होणार असं म्हटलं जातंय तर दुसरीकडेही अफवा असल्याचीही चर्चा आहे.
या सगळ्या अफवा आणि चर्चांपासून दूर मलायका अरोराने मस्तपैकी मालदीव्समध्ये वकाय म्हणजेच सुट्ट्या एन्जॉय केल्या. आपल्या या हॉलिडे टूरचे फोटोज आणि व्हिडीओ मलायकाने सोशल मीडियावर शेअर केले. मग काय लोकांनीही भरपूर कमेंट केल्या. एका युजरने तर या वेकेशनला लग्नाआधी करण्यात येणारी बॅचलर पार्टी असंही म्हटलं.
पाहा मलायकाचा बिकीनी अवतार...ज्यामध्ये मलायका फारच हॉट दिसत आहे.
View this post on Instagram
मलायकाच्या टोन्ड बॉडीचं रहस्य आहे तिचा सेल्फ कंट्रोल आणि योगा. त्यामुळे या वेकेशदरम्यानही मलायका योगा करायला विसरली नाही. पण तिचा हा अवतार काही लोकांना आवडल्याचं दिसलं नाही आणि लोकांनी सोशल मीडियावर तिला वाईट कमेंट्स दिल्या आहेत.
View this post on Instagram
मलायकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओही शेअर केला. ज्यामध्ये ती सुंदर समुद्रकिनाऱ्यावर सायकल चालवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहीलं आहे की, ‘निसर्ग हा अमूल्य आहे, त्याचं संरक्षण करा.’ या कमेंटवरूनही मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. एका युजरने लिहीलं की, ‘एकदा सायकल चालवून पर्यावरण बदलणार नाही, मुंबईमध्ये का कार चालवतेस. सायकलच चालव.’
अनेक सेलेब्स वेकेशनसाठी मालदीव्सला पसंती देताना दिसतात. ते इथल्या निसर्ग सौंदर्य आणि बीच लाईफमुळे. मालदीवमध्ये चहूबाजूकडे नजर फिरवल्यास तुम्हाला फक्त पाणीच पाणी दिसेल. त्यामुळे इथे वॉटर अॅडव्हेंचर्सची मजा घेऊ शकता. अंडरवॉटर फोटोग्राफीसाठीही जगातील सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे मालदीव्ज. बऱ्याच लोकांना हेही माहीत नसेल की, व्हेल आणि डॉल्फीन्स बघण्यासाठीही जगातील पाच बेस्ट जागांपैकी एकमध्ये मालदीव्जचं नाव घेतलं जातं.
असो अर्जुन आणि मलायकामध्ये शिजत असलेल्या या खिचडीबाबत खूपच चर्चा रंगत आहेत. आता हे बघायचं की, हे दोघं कधी लग्न करतात आणि ऑफिशियली ही बातमी कधी शेअर करतात.