अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा

अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा

सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचीच चर्चा सगळीकडे आहे. हे कपल सध्या बऱ्याच ठिकाणी डिनर आणि लंच डेटला एकत्र दिसत असतं. इतकंच नाही तर उद्योगपती मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाच्या रिसेप्शनलाहीही या दोघांना अगदी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं पाहण्यात आलं. मलायका आणि अरबाज खानचा दोन वर्षापूर्वी घटस्फोट झाला आणि तेव्हापासूनच मलायका आणि अर्जुनच्या अफेरची चर्चा होऊ लागली होती. यावर्षी मलायका आणि अर्जुन ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.


Malika Arora on her wedding with arjun kapoor Cover 5097893


मलायकाने ख्रिश्चन लग्नावर दिलं उत्तर
बऱ्याच दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एप्रिलमध्ये ख्रिश्नन पद्धतीने लग्न करणार अशी चर्चा रंगली आहे. पण या सर्व गोष्टींवर सध्या मलायकाने पूर्णविराम लावला आहे. मलायकाने अर्जुनबरोबर आपण ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. सध्या दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुन कपूरबरोबर आपण अशा कोणत्याही पद्धतीने लग्न करणार नसून हे फक्त मीडियाद्वारे छापण्यात आलेल्या न्यूज असल्याचं स्पष्ट केलं आहे. मलायकाने ही गोष्ट साफ नाकारली आहे. या चर्चा केवळ अफवा असल्याचंही मलायकाने म्हटलं आहे.


Malika Arora on her wedding with arjun kapoor


नात्यामध्ये असणं कोणाला नाही आवडत - मलायका
या मुलाखतीदरम्यान मलायकाने सांगितलं की, नात्यामध्ये असणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला आपण नात्यामध्ये असावं असं वाटतं. घटस्फोट झाल्यानंतरही तिला एकटीला राहायचं नाही. शिवाय मलायकने सांगितलं की, ‘मला लग्नानंतर इतक्या वर्षांनी घटस्फोट घेऊ नको असा सल्लाही लोकांनी दिला होता. पण मला वाटतं मी जो निर्णय घेतला तो योग्य होता. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात पुढे जायचं असतं. सर्व वाईट गोष्टी विसरायच्या असतात. ज्यांना आपल्या आयुष्यात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळते ते लोक नक्कीच नशीबवान असतात.’


Malika Arora on her wedding with arjun kapoor3


दरम्यान करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये जेव्हा अर्जुनला मलायकाचं नाव न घेता गर्लफ्रेंडला आपल्या कुटुंबाला भेटवायला आवडेल का? असं विचारलं असता अर्जुनने त्वरीतच नक्की आवडेल असं सांगितलं. शिवाय आपल्या कुटुंबामध्ये मागच्या काही महिन्यांपासून बरेच बदल घडले असून आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलल्याचंही अर्जुनने सांगितलं होतं. शिवाय याच शो मध्ये मलायकानेदेखील आपल्याला अर्जुन आवडत असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता हे दोघं कधी लग्न करणार आहेत याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


अरबाजशी घेतलेल्या घटस्फोटाबद्दल काय म्हटलं मलायकाने?


Malaika on her Divorce
नुकतंच करिना कपूरच्या रेडिओ शो मध्ये मलायकाने आपल्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला. तिने सांगितलं की, घटस्फोटाच्या आदल्या दिवशी पूर्ण कुटुंब एकत्र बसलं होतं. सर्वांनी तिला एकच प्रश्न विचारला की, तिचा हा निर्णय शंभर टक्के तिच्या दृष्टीने योग्य आहे का? जेव्हा मलायकाने हो म्हटलं तेव्हा तिच्या पूर्ण कुटुंबाने तिची साथ दिली. मलायकाच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर 19 वर्षांनी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. लग्न टिकवण्यासाठी आनंद सर्वात महत्त्वाचा असतो आणि जेव्हा एक कपल एकत्र आनंदी नसतं तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो आणि तिला आपल्या मुलावर असा परिणाम व्हावा असं वाटत नव्हतं.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करणार एप्रिलमध्ये लग्न


आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म


छत्रपती शासन चित्रपटाची जवानांना अनोखी मानवंदना