मालदिव्ज ठरतोय सेलिब्रिटीजचा 'हॉट'स्पॉट

मालदिव्ज ठरतोय सेलिब्रिटीजचा 'हॉट'स्पॉट, करत आहेत सुट्टी एन्जॉय

नुकतेच आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी मालदिव्जला रवाना झाली. तर दोन दिवसापूर्वीच टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हेदेखील दोघं सुट्टीसाठी मालदिव्जला रवाना झाल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसले होते. सध्या सोशल मीडियावर जिथे पाहावं तिथे मालदिव्जला जाणारे सेलिब्रिटी दिसून येत आहेत. विशेषतः या कोरोना काळात (Corona) मालदिव्ज हा सेलिब्रिटींसाठी हॉटस्पॉट ठरतंय असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. दर दोन दिवसांनी कोणी ना कोणी तरी सेलिब्रिटी आपले मालदिव्जचे फोटो पोस्ट करताना दिसून येत आहे. अगदी बॉलीवूडमधील कलाकारच नाहीत, तर अगदी टीव्हीवरील कलाकारांनाही मालदिव्जच्या सुट्टीची भुरळ पडली आहे. सध्या बरेच सेलिब्रिटी हे मालदिव्जच्या समुद्रामध्ये न्हाऊन आपले हॉट फोटोसेशन सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येत आहे. कोरोनाची स्थिती महाराष्ट्रात चिघळत चालली असून कलाकारांचं मात्र असं व्यक्तीगत आयुष्य मजेत घालवणं बऱ्याच जणांना मान्य नाहीये. तर कलाकारांचे चाहते मात्र त्यांचे हे फोटो आणि मालदिव्जचे फोटो एन्जॉय करताना दिसून येत आहेत. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या कलाकारांनी मालदिव्जमधील सुट्टी सध्या आनंदाने घालवली आहे. 

आलिया भट आणि रणबीर कपूर

आलिया आणि रणबीर नुकतेच मालदिव्जला रवाना झाले असून त्याचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल झाले आहेत. काल (19 एप्रिल) रोजी सकाळी ही जोडी मालदिव्जला आपली सुट्टी एकत्र घालविण्यासाठी रवाना झाली आहे. आलिया तर दोन महिन्यापूर्वीदेखील आपल्या मैत्रिणींसह मालदिव्जमध्ये सुट्टी घालवून आली होती. तर आता आपला प्रियकर रणबीर कपूर याच्यासह आलिया पुन्हा मालदिव्जला रवाना झाली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटोजची आता नक्कीच वाट पाहत आहेत. 

माधुरी दीक्षित

एक आठवड्यापूर्वीच माधुरीने आपल्या कुटुंबासह मालदिव्जच्या समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवला असल्याचे दिसून आले. माधुरी, पती श्रीराम नेने आणि मुलगा याच्यासह अनेक फोटो शेअर करत होती. तर तिने अनेक व्हिडिओदेखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी माधुरीचे हे फोटो आणि व्हिडिओ खूपच एन्जॉय केले. तर तिला या फोटोजना अनेक लाईक्सही मिळालेले दिसून येत आहे. 

कोरोनाचा फटका सोसत आहेत हे बिग बजेट चित्रपट 

सारा अली खान

काही दिवसांपूर्वीच आपली आई अमृता सिंह हिच्यासह सारा मालदिव्जला रवाना झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तर सारा नेहमीच आपली आई आणि भाऊ इब्राहिम याच्यासह वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जात असते. ती तिथले व्हिडिओदेखील नेहमी शेअर करत असते. नुकतीच ती आईसह रवाना झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

कोरोनापेक्षाही देशाला लागलेली कीड म्हणजे राजकारण, अभिनेत्रीने व्यक्त केला राग

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी

टायगर आणि दिशा नेहमीच एकत्र सुट्टी घालवताना दिसतात. दोनच दिवसापूर्वी ही जोडी मालदिव्जला रवाना झाल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. या दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल काहीच सांगितले नसले तरीही या दोघांना नेहमी एकत्र पाहिले जाते. कधी डिनर डेट असो अथवा कधी एकत्र बाहेर फिरणे असो. हे दोघेही बरेचदा एकत्र दिसून येतात. सध्या ही जोडीदेखील मालदिव्जमध्ये सुट्टी एकत्र घालवत आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी चित्रपटात साकारल्या नॉन ग्लॅमरस भूमिका

सुरभी ज्योती आणि रूत्विक धनजानी

टीव्हीवर प्रसिद्ध कलाकार असणारे सुरभी ज्योती आणि रुत्विक धनजानीदेखील काही दिवसांपूर्वीच मालदिव्जची मजेशीर ट्रीप करून आले आहेत. दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर एकमेकांसह असणारे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या मित्रमैत्रिणींसह ही ट्रीप दोघांनाही खूपच एन्जॉय केल्याचे दिसून आले आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक