बॉलीवूडपासून दुरावलेल्या मल्लिका शेरावतचा ‘फिटनेस फंडा’

बॉलीवूडपासून दुरावलेल्या मल्लिका शेरावतचा ‘फिटनेस फंडा’

बॉलीवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या बॉलीवूडपासून दूरावली आहे आहे. एकेकाळी बॉलीवूडची हॉट अॅंड सेक्सी अभिनेत्री म्हणून मल्लिकाची ओळख होती. मल्लिकाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिका साकारल्या होत्या. ख्वाहिश, मर्डर, हिस्स, किस किस की किस्मत, प्यार के साईड इफेक्ट्स, वेलकम या चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं. अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉंग्जदेखील केले होते. त्यामुळे तिच्याकडे एक हॉट अभिनेत्री म्हणूनच पाहिले जात होते. एकाच प्रकारच्या भूमिका कराव्या लागत असल्यामुळे मल्लिका शेरावतने बॉलीवूडला रामराम ठोकला. सध्या ती चित्रपटसृष्टीच्या या ग्लॅमरस दुनियेपासून दूर मेडिटेशन आणि योगासने यामध्ये मनशांती शोधत आहे. काही दिवसांपूर्वीच मल्लिका शेरावतने तिचे योगासने आणि मेडिटेशन करत असलेले काही फोटो सोशल मीडयावर शेअर केले आहेत. ज्याला तिच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यावरून तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला दिसत आहे. एका फोटोत मल्लिका शेरावतने हलासन करतानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यासोबत तिने लिहीलं आहे की, " हलासन हे योगासन माझं सर्वात आवडतं आसन आहे. कारण यामुळे तुमच्या मेंदूला शांतता मिळते. तणावापासून मुक्ती मिळते. शरीर आणि मनाला आराम मिळतो.

मेडिटेशन तणावापासून दूर राहण्याचा उत्तम मार्ग

दुसऱ्या एका फोटोमध्ये मल्लिका मेडिटेशन करत असताना दिसत आहे. ज्यामध्ये ती शांतपणे मेडिटेशन करत आहे. या फोटोसोबत तिने लिहीलं आहे की, “योगासने आणि मेडिटेशन केल्यामुळे मला माझ्या आजीच्या जाण्याचं दुःख पचवण्यात मदत होत आहे.” याचं कारण असं की काही दिवसांपूर्वीच तिच्या आजीचं निधन झालं आहे. आजीवर तिचं जीवापाड प्रेम होतं. आजीच्या जाण्याचं दुःख कमी करण्यासाठी तिने मेडिटेशनचा आधार घेतला आहे. ज्याचा तिला चांगला फायदा झाल्याचं दिसून येत आहे. 

मल्लिका आणि बॉलीवूडमध्ये का आलाय दुरावा

मल्लिकाने एके काळी हॉट आणि बोल्ड भूमिका करून अनेक चाहत्यांच्या मनात तिचं एक हटके स्थान निर्माण केलं होतं. मल्लिकाचं खरं नाव रिमा लांबा असूनही तिने चित्रपटात एक  स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःचं नाव मल्लिका शेरावत असं जाहीर केलं होतं. तिने साकारलेल्या अनेक बोल्ड आणि हॉट गाजल्या. मात्र आता मल्लिकाला बॉलीवूडमध्ये काम करण्याची मुळीच इच्छा नाही. मल्लिकाच्या मते बॉलीवूडमध्ये फक्त त्याच हिरॉईन्सनां काम मिळतं ज्या अभिनेत्री चित्रपटातील हिरोंना डेट करतात. यासाठीच मल्लिका बॉलीवूडमध्ये काम करण्यास सध्या तयार नाही. मल्लिकाने मीटू वरही याबाबत तिची उघड प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसंच काही महिन्यांपूर्वी ती फक्त ‘बू - सबकी फटेगी’ या वेबसिरिजमध्ये काम केलं होतं. ‘बू सबकी फटेगी’ ही एक हॉरर वेबसिरिज होती. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यानंतर मात्र ती डिजिटल माध्यमातदेखील काम करताना दिसत नाही आहे. त्यामुळे मल्लिकाने बॉलीवूड संन्यास घेत आत्मशांतीसाठी मेडिटेशनचा मार्ग निवडल्याची चर्चा सध्या रंगत आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

अधिक वाचा

गौरी कुलकर्णीला अभिनयासोबत आहे ‘या’ गोष्टीची आवड

#Nostalgia : गौरीने शाहरूख-काजोलचा हा लुक केला होता डिझाईन

सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय लोकांची पसंती