बिग बॉसच्या या स्पर्धकाने केला इन्स्टाग्रामला अलविदा

बिग बॉसच्या या स्पर्धकाने केला इन्स्टाग्रामला अलविदा


सोशल मीडिया हा कलाकारांसाठी फॅन्सचा जवळ जाण्याचा मार्ग असला तरी सुद्धा हाच मार्ग अनेकांच्या डोक्याचा तापही होतो. असेच काहीसे मंदना करीमीसोबत झाले आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असलेल्या मंदनाने इन्स्टाग्रामला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. एक व्हिडिओ पोस्ट करत तिने या मागील कारणही सांगितले आहे. पण तिने अकाऊंट डिलीट न करता काही काळासाठी या माध्यमापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. जाणून घेऊया नेमक्या कोणत्या कारणासाठी मंदना करीमी इन्टापासून दुरावली आहे.

कंगनाच्या आईला का सतावत आहे मुलीच्या लग्नाची चिंता, शेअर केली भावनिक पोस्ट

या कारणामुळे दुखावली मंदना

Instagram

सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीला फॅन फॉलोवर्स असतात. पण त्यातून त्यांना अनेकदा ट्रोलही केले जाते. बिग बॉसच्या 9 व्या सिझनची स्पर्धक असलेली मंदना ही एक इराणी/ भारतीय मॉडेल असून मॉडेलिंग विश्वात ती फारच प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती तिच्या परफेक्ट बॉडीचे फोटो नेहमीच शेअर करत असते. तिच्या बिकिनी, वर्कआऊट आणि बॉडी दाखवणाऱ्या फोटोजला बरेच लाईक मिळत असले तरी देखील काहीजण तिला तिच्या या हॉट फोटोवरुन ट्रोलही करतात. तिच्या फोटोखाली येणाऱ्या अशाच काही कमेंटमुळे ती त्रस्त असल्याचे सांगितले आहे.  अनेक जण तिच्या फोटोखाली तिच्या शरीराची अवहेलना करतात. सेक्शुअली अत्यंत वाईट अशा गोष्टी लिहितात त्यामुळेच तिने या सगळ्यापासून काही काळासाठी दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिने एक व्हिडिओ करत या संदर्भात माहिती दिली आहे. या संदर्भातील एक IGTV व्हिडिओ फारच प्रसिद्ध होताना दिसत आहे. 

प्रदर्शित व्हायच्या आधीच 'गँग्ज ऑफ फिल्मिस्तान'वादात, अभिनेत्रीचा आरोप

नेहमीच होत असते ट्रोल मंदना

मंदना सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोवर कायमच ट्रोल करणाऱ्या कमेंट असतात. ही पहिली वेळ नाही की ती ट्रोल झाली आहे. तिच्या अनेक फोटोंवर तिला अनेकदा वाईट कमेंट दिल्या जातात. पण गेल्या काही दिवसांमध्ये तिने काही असे फोटो शेअर केले जे खूपच बोल्ड आहेत. त्यामुळे तिला या फोटोंच्या आधारावर संपूर्ण सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पण हे ट्रोलिंग मंदनाने फारच मनावर घेतलेले दिसते. फॅन्सची काळजी करत ट्रोलर्सपासून दूर राहण्यासाठी सोशल मीडियाच नको असे म्हणज तिने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मंदनाचे इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. पण आता तिला काही काळासाठी या सगळ्यापासून दूर राहायचे आहे. 

#MeToo प्रकरणात साजिद खानवर केले आरोप

 देशभरात #MeTooची लाट असताना अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबाबात सांगितले होते. मंदनाने देखील एका मुलाखतीत तिच्यावर झालेल्या गैरवर्तनाबाबत सांगितले. ‘क्या सुपर कुल है हम’ या चित्रपटाच्यावेळी साजिद खानने तिला गरी बोलावून कपडे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर साजिद खानचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले. मंदना करीमीने तिच्यासोबत झालेला किस्सा झाल्यानंतरही अनेकांनी तिला यावरुनही ट्रोल केले होते.


अनेक हिंदी चित्रपटांमधून काम केलेल्या मंदनाचा फॅन फॉलोविंग बेस चांगला असला तरी ट्रोलिंग कंटाळून तिने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

अजून एका अभिनेत्याची 'गुड न्यूज'ची घोषणा, दुसऱ्यांदा होणार बाबा