लॉकडाऊनमध्ये या टीव्ही अभिनेत्याने गुपचूप केले लग्न

लॉकडाऊनमध्ये या टीव्ही अभिनेत्याने गुपचूप केले लग्न

2020 मध्ये अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार होते. अनेकांच्या लग्नाची जोरदार तयारी देखील झाली होती. पण अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्यांच्या लग्नाचे प्लॅन रद्द करावे लागले. काहींना तर त्यांचे शाही सोहळे सोशल डिस्टंसिंगमुळे रद्द करावे लागले. आता #MissionBeginAgain ला सुरुवात झाल्यानंतर काही सोहळ्यांना थोडीशी मोकळीक देण्यात आली आहे. याचा फायदा घेत अनेकांनी त्यांचे लग्नसोहळे अत्यंत साधेपणाने आणि निवडक लोकांच्या उपस्थितीत अनेकांनी त्यांची लग्न उरकली आहेत. ‘ससुराल सिमर का’ मालिका फेम अभिनेता मनिष रायसिंह देखील विवाहबंधनात अडकला आहे. टीव्ही अभिनेत्री संगीता चौहानसोबत त्याने लग्न केले आहे. त्याचे काही फोटो आता वायरल होऊ लागल्यानंतर त्यानेच सगळ्या फॅनपर्यंत ही बातमी पोहोचवली आहे. त्याने त्याच्या फॅनसाठी एक खास पोस्टदेखील लिहिली आहे.

गुरुद्वारामध्ये पार पडलं लग्न

कोणत्याही गर्दीशिवाय आणि सगळ्या नियंमांचे पालन करुन मनिषचा हा विवाहसोहळा पार पडला आहे.  मनिषच्या लग्नासाठी घरातील मोजकी म्हणजे 5 -6 नातेवाईकच उपस्थित होते. इतर सगळीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच व्हिडिओ कॉलमधून उपस्थित होती. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठीच्या नियमांचे अत्यंत तंतोतंत पालन करत त्याने हा समारंभ पार पाडला आहे.  त्यांच्या या लग्नातील काही क्षण  म्हणजेच फोटो देखील काहींनी वायरल केले आहेत. या दोघांनी लग्नासाठी गुलाबी शेडमधील कपडे निवडले होते. त्या दोघांवरही हा रंग फारच खुलून दिसत होता. अशा स्वरुपाच्या कमेंट देखील त्यांना त्यांच्या फॅन्सनी दिल्या आहेत. त्याची सहकलाकार आणि बालिका वधू फेम अविका गौर हिने देखील त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अविकाच्या वाढदिवसाच्या दिवशीच मनिषने लग्न केल्यामुळे तिने या दिवसाचा आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा वादात, अभिनवने केले गंभीर आरोप

केली घोषणा

लॉकडाऊनमुळे मनिषच्या लग्नाबाबतची फार उघड उघड माहिती सगळ्यांना नव्हती. त्याने या संदर्भात फार काही शेअरही केले नव्हते. पण लग्नाचे फोटो आल्यानंतर त्याने मात्र या गोष्टीचा उलगडा करुन टाकला. त्याने लग्न झाल्याचे सांगत नव्या जोडप्याचा एक नवा कोरा फोटो देखील शेअर केला. त्या फोटोंवर अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनिषने त्याच्या लग्नाची पत्रिकाही अगदी हटके अशी केली होती. संगीता आणि मनिष यांच्या रिलेशनशीपबद्दल अनेकांना आधीपासूनच माहिती होती. पण ते लग्न कधी करणार हे माहीत नव्हते. पण वाढणारा लॉकडाऊन पाहता त्यांच्या घरातल्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न करण्याचा घाट घातला म्हणूनच त्याने नियमांचे पालन करत लग्न केले.

 अभिनेत्री अवनीत कौरची इमोशनल गुडबाय नोट, अलाद्दीन मालिकेतून घेतली एक्झिट

कोण आहे मनिष ?

Instagaram

मनिष हा टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा आहे त्याने अनेक मालिकांमधून काम केले आहे. त्यामुळे त्याचा फॅनबेसही तितकाच तगडा आहे. संगीता चौहान ही देखील एक हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमधून काम केली आहेत. हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 


आणखी ही काही जोड्या या काळात विवाहबद्ध होणार आहेत असे देखील कळत आहे.

रितेश आणि जेनेलियाचा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय, सोशल मीडियावर केले शेअर