‘आलियाबरोबरच्या नात्यात खूप चढउतार होते’ - सिद्धार्थ मल्होत्रा

‘आलियाबरोबरच्या नात्यात खूप चढउतार होते’ - सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलीवूडमध्ये अनेक जोड्या प्रेमात एकत्र येतात आणि विभक्त होत असतात. पण त्यापैकी बऱ्याच जोड्या प्रेक्षकांनाही कायम एकत्र राहाव्या असं वाटत असतं. त्यापैकी एक जोडी होती ती म्हणजे आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा. आलिया आणि सिद्धार्थने करण जोहरच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटापासून त्यांची जोडी प्रेक्षकांना भावली आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. पण कधीही आपण एकमेकांना डेट करत आहोत याची वाच्यता दोघांनी केली नाही किंवा मीडियासमोर वावरले नाहीत. पण तरीही त्यांच्याबद्दल सतत चर्चा होती. पण या नात्यावर पहिल्यांदाच सिद्धार्थने भाष्य केलं आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये सिद्धार्थने पहिल्यांदाच आलियाविषयी भाष्य केलंय.


दोघांमध्ये कोणताही कडवटपणा नाही


कोणत्याही नात्यामध्ये चढउतार होत असतात आणि बॉलीवूडमधील कपल्सदेखील याला अपवाद नाहीत. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, दोघं वेगळे झाले असले तरीही त्या दोघांमध्ये कोणताही कडवटपणा नाही. आलिया आणि त्याच्या नात्यामध्ये बरेच चढउतार आल्याचेही त्याने यावेळी मान्य केले. दोघांनीही नात्यातून बाहेर आल्यानंतर कधीही एकमेकांची भेट घेतली नाही हेदेखील सिद्धार्थने सांगितले. पण याचा अर्थ तिच्याबद्दल मनात कोणताही कडवटपणा आहे असं होत नाही हे पण सिद्धार्थने स्पष्ट केले. आलियाला डेट करण्याआधीपासूनच आपण ओळखत असल्याचेही सिद्धार्थ यावेळी म्हणाला. या नात्यातून बाहेर पडणं आपल्यासाठी खूप कठीण गेले असंही यावेळी सिद्धार्थने सांगितले. या नात्यात अतिशय गुंतल्यामुळे यातून मनाने बाहेर पडून पुन्हा एकदा व्यावसायिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणंही कठीण गेलं. कोणत्याही नात्यामध्ये एकत्र राहायचं नाही हे ठरवण्यामागे दोन माणसांची काही महत्त्वाची कारणं असतात. तुम्ही जेव्हा अशा परिस्थितीमधून बाहेर येता आणि मागे बघता तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगल्या आठवणी जाणवतात. पण पुन्हा तुम्हाला त्यातून बाहेर येणे गरजेचे असते. तसाच कडवटपणा घेऊन तुम्ही जगू शकत नाही असेही सिद्धार्थने यावेळी करणला सांगितले. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूर यावेळी अगदी मनापासून या शो मध्ये बोलले. 


sid
स्टुडंट ऑफ द ईअरमध्ये पहिल्यांदा एकत्र


आलिया, वरूण आणि सिद्धार्थने स्टुडंट ऑफ द ईअरमधून पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतरच आलिया आणि सिद्धार्थचं नाव एकमेकांबरोबर जोडले जाऊ लागले. त्यानंतर दोघांनाही धर्मा प्रॉडक्शनच्या कपूर अँड सन्समधून पुन्हा एकदा एकत्र काम केले. तर 2016 मध्ये दोघंजण एकमेकांना डेट करायला लागले आणि त्यानंतर जास्त काळ त्यांचे नाते टिकू शकले नाही. सध्या सिद्धार्थचे नाव जॅकलिन फर्नांडिसबरोबर जोडले जात असून त्याने त्याचे नाते तिच्याबरोबर आहे की नाही हे स्पष्ट केलेले नाही. तर आलिया सध्या तिच्या ब्रम्हास्त्र को-स्टार रणबीर कपूरला डेट करत असून बऱ्याचदा या दोघांनाही एकत्र पाहिले आहे. इतकेच नाही तर सध्या आलिया आणि रणबीरचे आई - वडीलदेखील बऱ्याचदा एकत्र दिसतात आणि हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचेही म्हटले जात आहे. शिवाय गेल्यावर्षीपासून रणबीरचे वडील ऋषी कपूर हे न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर उपचार घेत असून आलियादेखील बऱ्याचदा त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी रणबीरबरोबर जात असते. हे सगळे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


aalia sid FI


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


सोनाली बेंद्रे इज ‘बॅक’, शुटींगला केली सुरुवात


‘भाईः व्यक्ती की वल्ली’ चित्रपटातील लुक साकारण्यासाठी तिरूपतीहून मागवण्यात आले केस


'या' कारणामुळे करणवीर बोहरा अडकला होता मॉस्कोत