देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांनाच लक्ष्य केले आहे. देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन परिस्थिती उद्भवली आहे. गेल्यावर्षी होतो त्याच ठिकाणी आज आपण येऊन पोहोचलो आहोत. सध्य परिस्थिती कोरोना संक्रमण, ऑक्सिजनचा तुटवडा या सगळ्या परिस्थितीमुळे देशात आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. सर्वसामान्यांना या वर्षभरात सरकारने काय केले? असा प्रश्न पडला असला तरी ते कोणाला जाऊन विचारणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण एक सर्वसामान्य नागरिक आणि मराठी सेलिब्रिटी आस्ताद काळे याने थेट सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. त्याने एक पोस्ट शेअर करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सध्या आस्तादची हीच पोस्ट खूप व्हायरल होताना दिसत आहे.
कोरोनापेक्षाही देशाला लागलेली ‘कीड’ म्हणजे राजकारण, अभिनेत्रीने व्यक्त केला राग
प्रश्न विचारणार ?
देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आणि सर्वसामान्यांचे आयुष्यच बदलून गेले. पण प्रश्न कोणाला विचारणार? असा सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नाचे नेतृत्वच जणून आस्ताद काळेने थेट त्याच्या पोस्टमधून राजकारण्यांना खरमरीत प्रश्न विचारले आहेत. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
प्रश्न विचारायचे आहे…. स्वत्व जपायचे आहे…कदाचित जीव गमवावा लागू शकतो…. श्शू कुठे बोलायचं नाही!
.
अरे हाड..
आम्ही तर प्रश्न विचारणार..
सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला…
उत्तरं न देता आम्हाला गप्प करु बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…
नागडे राजकारणी, नागडं सरकार..
निरोप घेतो
आस्ताद काळेच्या या पोस्टनंतर सगळीकडे त्याचीच चर्चा होऊ लागली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याची पाठराखण केली आहे. तर काहींनी त्याच्य चुकाही काढल्या आहेत.
कंगना पुन्हा बरळली, आता म्हणते ‘नरेंद्र मोदी राजीनामा द्या’
आस्तादने काढून टाकला देश शब्द
आस्तादने केलेल्या पोस्टमध्ये सगळ्यात शेवटच्या ओळीत नागडे राजकारणी… नागडं सरकार आणि त्यापुढे ‘नागडा देश’ असे लिहिले होते. पण अनेकांना देशाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही असे वाटले. त्यामुळेच आस्तादनेही पोस्टमधून नागडा देश काढून टाकलेला आहे. त्यामुळे आता नव्याने पोस्ट पाहणाऱ्यांना आता जुनी पोस्ट कळू शकणार नाही. पण कमेंट वाचल्यानंतर मात्र याचा अगदी अचूक अंदाज येतो. आस्ताद अनेकदा मालिकांमध्ये ग्रे शेडमध्ये दिसला आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट अगदी तशीच बिनधास्त आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करणारी आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुखचा दुसऱ्या लग्नाबाबत निर्णय, दिले उत्तर
तेजस्विनीनेही केलं होत सरकारला टार्गेट
आस्तादच्या आधी तेजस्विनी पंडीतनेही या आधी राजकारण्यांवर टीका केली होती. देशात जी काही परिस्थिती सुरु आहे. त्यामुळे अनेकांना पैशावाचून मरण्याची समस्या उद्धवू लागली आहे. पण याचा विचार करत कोण? केवळ राजकारण सुरु असल्याच्या संदर्भातील एक स्टोरी तेजस्विनीने केली होती. आता आस्तादनेही अशी पोस्ट केल्यामुळे सरकारवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तुम्हाला काय वाटतं आस्ताद काळेची ही पोस्ट तुम्हाला योग्य वाटते का? आम्हाला नक्की कळवा.