ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, चाहत्यांना सुखद धक्का

प्रसिद्ध मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, चाहत्यांना सुखद धक्का

सध्या लग्नाचा हंगामच सुरु झाला आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. मराठी चित्रपट आणि मालिकासृष्टीमध्ये तर सध्या लग्नाचे वारेच वाहत आहेत. नुकतंच अभिज्ञा भावेचं लग्न झालं. तर त्याआधी शर्मिष्ठा राऊतने लग्न केलं. आता प्रसिद्ध मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णीनेही गुपचूप लग्न केले आहे. मागच्या  आठवड्यात 8 जानेवारीला अभिनेत्री रूचिका पाटीलशी आशुतोष विवाहबद्ध झाला आहे. पुण्यात हे लग्न संपन्न झाले. मात्र याचा कोणताही गाजावाजा न करता आशुतोषने लग्न केले. आता त्याच्या लग्नाचे फोटो अचानक व्हायरल झाल्यामुळे आशुतोषची ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना कळल्यामुळे चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. या लग्नसोहळ्याला आशुतोषच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती. तर धनश्री काडगावकरदेखील उपस्थित होती. 

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून नायराची एक्झिट, शिवांगी जोशीने सोडली मालिका

रूचिकाही आहे अभिनेत्री

आशुतोष कुलकर्णीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. असंभव, साथ दे तू मला, लेक माझी लाडकी अशा  मराठी मालिकांमधून आशुतोष घराघरामध्ये पोहचला. असंभव ही मालिका तर तुफान गाजली होती. तर अनेक मराठी चित्रपटांमधूनही आशुतोषने काम केले आहे. तर आशुतोषची पत्नी रूचिा हीदेखील अभिनेत्री आहे. गणपती बाप्पा मोरया, असे हे कन्यादान अशा मालिकांमधून रूचिकाने काम करत आपली ओळख निर्माण केली. रूचिकाने इंजिनिअरिंग केले असून 2014 मध्ये श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेने तिचे नशीब बदलले असल्याचे रूचिका सांगते. या स्पर्धेत ती सेकंड रनरअप होती. त्यानंतर तिने अभिनयाला सुरूवात केली. रूचिकाला याशिवाय पेंटिंग आणि क्राफ्टिंगचीही आवड आहे. तर आशुतोष अभिनयाशिवाय दिग्दर्शनही करतो. आशुतोष आणि रूचिका लग्नामध्ये अत्यंत सुंदर दिसत असून अगदी मराठमोळ्या पुणेरी पेहरावात दोघेही दिसून येत आहेत. या दोघांचे लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तर त्यांच्या रिसेप्शनचेही काही फोटो व्हायरल झाले आहेत. आशुतोष आणि रूचिका अत्यंत आनंदी दिसत आहेत. दरम्यान आशुतोष सध्या कोणत्याही मालिकेत दिसून येत नसला तरीही त्याच्याकडे नवे कोणते प्रोजेक्ट आहेत याचीही माहिती नाही. पण त्याने लवकरच पुन्हा एकदा मालिकेतून दिसावे अशी इच्छा त्याच्या चाहत्यांची नक्कीच आहे. 

अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

ADVERTISEMENT

मराठी सेलिब्रिटींचे होणार यावर्षी लग्न

आशुतोषप्रमाणेच आता अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. यामध्ये अभिनेत्री मानसी नाईकच्याही लग्नाची तयारी सुरू झाली आहे.  आपला प्रियकर प्रदीप खरेरा याच्यासह मानसी नाईक 19 जानेवारीला लग्नबंधनात अडकत आहे. तर दुसऱ्या बाजूला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचेही आता लवकरच लग्न आहे. सध्या दोघेही आपल्या नातेवाईकांकडे आणि मित्रमैत्रिणींकडे केळवणीला जाताना दिसून येत आहेत. दोघांचेही फोटो सतत व्हायरल होत असतात. तर अप्सरा सोनाली कुळकर्णी आणि कुणाल बेनोडकर यांचा मागच्या वर्षी साखरपुडा झाला असून ही जोडीदेखील याचवर्षी लग्न करणार असल्याचे समजत आहे. मात्र यांच्या लग्नाची तारीख अजूनही कळू शकलेली नाही. एकंदरीतच सध्या मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाची लाट आलेली पाहायला मिळत आहे. 

‘POPxo मराठी’ कडून आशुतोष कुलकर्णी आणि रूचिका पाटील यांना लग्नाच्या शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठीही मनापासून शुभेच्छा!

मुलगी झाली हो! विराटच्या भावाने शेअर केली मुलीची झलक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Jan 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT