मराठीतील ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मराठीतील ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मराठी चित्रपट आणि नाटक सृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी गाजवलेले अविनाश खर्शीकर यांची प्रकृती यावर्षाच्या सुरूवातीपासूनच नाजूक होती. जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांची तब्बेत अधिकाधिक खालावत गेली आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावर्षी अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीला एक प्रकारे नजरच लागली असल्याचीही आता चर्चा होत आहे. अविनाश खर्शीकर यांची एक्झिट ही नक्कीच मनाला चटका लावणारी असल्याचे अभिनेत्री रेणुका शहाणे हिने ट्विट करत सांगितले. 

कोरोना काळात 'या' अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, दोन महिन्याने केले जाहीर

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा हिरो निखळला

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा अभिनेता अशी अविनाश खर्शीकर यांची ओळख होती. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड झाला आहे. त्यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 1978 मध्ये ‘बंदीवान मी संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही. आधार, आई थोर तुझे उपकार, जसा बाप तशी पोरं, माफीचा साक्षीदार, दे टाळी असे अनेक मराठी चित्रपट गाजवलेच. घरचा भेदी हा चित्रपट तर तुफान चालला होता. तर वासूची सासू, तुझे आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी या नाटकांनाही तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यांची ही नाटकं प्रचंड गाजली होती. 

तापसी पन्नूचा वेकेशन मूड, बहिणींसोबत मालदिव्जमध्ये करत आहे मजा

दामिनी मालिकेने दिली वेगळी ओळख

मराठीमधील ‘दामिनी’ ही मालिका त्यांच्या आयुष्यातील अप्रतिम मालिका ठरली होती. या मालिकेतील भूमिकेने अविनाश खर्शीकर यांना मालिका या माध्यमातून वेगळी ओळख मिळवून दिली. अत्यंत सुंदर आणि तितकाच अप्रतिम अभिनय करणारा अभिनेता म्हणून अविनाश खर्शीकर यांची ओळख होती. पाच दशकांपेक्षा अधिक काळ अविनाश खर्शीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तब्बल 40 पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये अविनाश खर्शीकर यांनी काम केले. तर काही चित्रपटांचा निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले होते. कोणाच्याही अध्यातमध्यात नसणारा असा हा अभिनेता होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्बेत ढासळली होती. जानेवारी महिन्यातही त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी यावर्षी बराच काळ आजाराशी झुंज दिली. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी अविनाश यांचे निधन झाले. सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले असून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ही बातमी शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदीर्घ आजाराने अविनाश खर्शीकर यांचे निधन झाले असून मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

आठवड्याभरात बिग बॉस 14 गाजवणारी मराठमोळी निक्की तांबोळी नक्की आहे कोण

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक