‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवूडच्या ‘राहुल’ला

‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवूडच्या ‘राहुल’ला

प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटणं ही खास गोष्ट असते. मग तो व्यक्ती स्वतः अभिनेता का असेना. ती फॅन मूमेंट त्याच्यासाठी खास असते. असंच काहीसं झालं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दुस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापसोबत. बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, कभी खुशी कभी गम, चैन्नई एक्सप्रेस आणि फॅन या सिनेमांमधल्या राहुलला किंगखानचे चाहते विसरूच शकत नाहीत. किंबहुना राहुल या नावाला ग्लॅमर लाभलं ते बॉलीवूडच्या या बादशाहमुळेच.

Instagram

अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही 'जागो मोहन प्यारे' या मालिकेत राहुलची भूमिका रंगवली होती. या मराठी मालिकेतल्या राहुलला नुकतीच बॉलीवुडचा बादशाह असलेल्या राहुलला भेटायची संधी मिळाली. पृथ्वीकने ही फॅनमूमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर केली आणि आपला शाहरूख खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.

हा फोटो टाकताना पृथ्वीकने म्हटलंय, “आज मैं जो कुछ भी हूं... बस आप के वजह से हूं. लाईफ रिस्क पे लगादी आप से मिलने के लिए. अ ड्रीम कमिंग ट्रू”

View this post on Instagram

#kahani_puri_filmy_hai Send “रिश्ता’s” ❤️

A post shared by PRITHVIK PRATAP (@kahani_puri_filmy_hai) on

या भेटीविषयी पृथ्वीक प्रतापला विचारल्यावर तो म्हणाला की,“ शाहरूख खानचा एक डायलॉग आहे, ‘इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की हैं’  माझ्याबाबतीत अगदी तेच घडलंय. सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते की, बॉलीवूडच्या या किंगला एकदा तरी भेटावं. ती इच्छा पूर्ण होणं, हे स्वप्नवत होतं.”

ही भेट कशी झाली? येत्या काळात शाहरूखसोबत काही प्रोजेक्ट होणार आहे का?, असं विचारल्यावर पृथ्वीक म्हणतो, “शाहरूख खानसोबत काम करायला कुणाला नाही आवडणार. पण या विषयीचा खुलासा मी लवकरच करीन. सध्या या विषयी जास्त बोलणं शक्य नाही.” याचाच अर्थ आपला मराठीतला राहुल लवकरच बॉलीवूडमधल्या राहुलबरोबर झळकणार असं दिसतंय.