सिद्धार्थ-मितालीच्या खास क्षणांनी सजलाय 'व्हॅलेंटाईन डे'

सिद्धार्थ-मितालीच्या खास क्षणांनी सजलाय 'व्हॅलेंटाईन डे'

प्रेमयुगुलांसाठी 'व्हॅलेंटाईन डे' खास असतो. सेलिब्रेटींमध्ये यंदाच्या व्हॅलेंटाईन डे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरसाठी देखील खूपच 'स्पेशल' आहे. मागील दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि मिताली रिलेशनशिपमध्ये आहेत. मागच्यावर्षी व्हॅलेंटाईन डेला त्यांनी ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं जाहीर केलं होतं. आता लवकरच ते विवाहाच्या प्रेमळ बंधनात अडकणार आहेत. या वर्षी 24 जानेवारीला त्यांचा साखरपुडादेखील झाला. साखरपुड्यानंतर त्यांचा हा पहिलाच 'व्हॅलेंटाईन डे' आहे. त्यामुळे हा व्हॅलेंटाईन डे दोघांसाठी जरा जास्तच स्पेशल आहे. व्हॅलेंटाईन डे खास करण्यासाठी सिद्धार्थने त्यांच्या साखरपुड्यातील काही खास आणि रोमॅंटिक आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साखरपुड्याचे 'रोमॅंटिक क्षण'


साखरपुडा ते लग्न हा प्रवास प्रत्येकासाठी फारच रोमांचक असतो. या काळातील प्रत्येक क्षण प्रत्येक कपल आयुष्यभर फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून जपून ठेवत असतात. कारण ते तुम्हाला आयुष्यभर त्या गोड प्रसंगांची आठवण करून देत राहतात. हा व्हिडीओ सिद्धार्थ आणि मितालीसाठीदेखील आयुष्यभर नक्कीच स्पेशल असणार आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साखरपुड्याच्या आधीची तयारी आणि धमालमस्ती, साखरपुड्यातील विधी, मित्रांची चेष्टामस्करी, वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद असं सारं काही टिपण्यात आलं आहे. साखरपुड्यानंतर जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी दिलेल्या एक पार्टीचे देखील काही क्षणही त्यात आहेत. या पार्टीमध्ये सिद्धार्थने मितालीसाठी एक रोमॅंटिक गाणं गायलं आहे. हे गाणं इंग्रजीमध्ये असून ते मितालीचं फेव्हरेट गाणं आहे. या गाण्यामधून व्यक्त केलेल्या भावनांमुळे मिताली खूपच भावूक झाली आहे. साखरपुड्यानंतरच्या पार्टीसाठी सिद्धार्थ आणि मितालीचे जवळचे मित्र आणि मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थने 'असं घडलं सगळं, एक छोटीशी छलक' म्हणत हा व्हिडीओ त्याच्या इंन्स्टा अकांऊटवरून शेअर केला आहे. त्यासोबत सोशल मीडियावरून त्याने मितालीला व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देत त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जोडीला #tinypanda म्हणून ओळखलं जातं. कारण सिद्धार्थ आणि मिताली नेहमीच फोटो शेअर करत असताना #tinypanda हा हॅशटॅग वापरतात. व्हॅलेंटाईन डेच्या या पोस्टमध्येही सिद्धार्थने #24thJan #tinypanda असं टॅग केलं आहे.

सिद्धार्थ आणि मिताली दोन वर्षांपासून 'रिलेशनशिप'मध्ये


सप्टेंबर 2017 पासून सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांच्या प्रेमात आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये म्हणजेच मितालीच्या वाढदिवसाच्या दिवशी सिद्धार्थने अगदी रोमॅंटिक पद्धतीने रींग घालून तिला प्रपोज केलं होतं. मितालीनेही अगदी कोणताही विचार न करता त्याला होकार दिला होता. सिद्धार्थ आणि मिताली या दोघांचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या एकत्र येण्याने त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. साखपुड्यानंतर सोशल मीडियावरून या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला. सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहे. तर मितालीचाही चाहता वर्गही खूप मोठा आहे. फॅन्सनां आता सिद्धार्थ आणि मिताली लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता हा साखरपुड्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे.


siddarth and mital


 


अधिक वाचाः


आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’, पत्रिका व्हायरल


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम