गौरी कुलकर्णीला अभिनयासोबत आहे ‘या’ गोष्टीची आवड

गौरी कुलकर्णीला अभिनयासोबत आहे ‘या’ गोष्टीची आवड

आपल्या लाडक्या सेलिब्रिटीजनां सोशल मीडियावर चाहते  नेहमीच फॉलो करत असतात. त्यांच्या आवडीनिवडी, सेटवर किंवा त्यांच्या फावल्या वेळात ते विरंगुळ्यासाठी करत असलेल्या गोष्टी, इतकंच नाही तर त्यांच्या खाजगी जीवनातील अनेक गोष्टींवर चाहते लक्ष ठेवून असतात. बऱ्याचदा त्यांना कोणता पदार्थ आवडतो अथवा त्यांना कोणती पुस्तके आवडतात याची चाहत्यांमध्ये चर्चा असतात. कधी कधी काही कलाकार आपल्या काही गोष्टी 'टॉप सीक्रेट' ठेवण्याच्या प्रयत्न करतात तर काही सेलिब्रेटी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्व गोष्टी मोकळेपणाने चाहत्यांना सांगतात. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतील सई अर्थात अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिच्या जीवनातील काही खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. 

काय आहेत गौरीच्या आवडीनिवडी

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या टेलिव्हिजन मालिकेतून सई म्हणजेच गौरी कुलकर्णी घराघरात पोहचली आहे.गौरी कुलकर्णीची ही पहिल्यांदाच टेलिव्हिजन माध्यमात काम करत आहे. यापूर्वी तिने रांजण या चित्रपटात काम केलं होतं.ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील सई आणि नचिकेत यांची प्रेमकहाणी चाहत्यांना फारच आवडत आहे. कारण ही प्रेमकहाणी इतरांपेक्षा थोडीशी  हटके आहे. या प्रेमकहाणीला 'मराठी भाषेचा आणि मराठीवरील प्रेमाचा' एक सुंदर साज आहे. यात पारंपरिक महाराष्ट्रीय कुटुंबातील मुलीची भूमिका साकारणारी गौरी, स्वतः फार उत्तम मराठी बोलते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. गौरीच्या मते तिचा वाचनाचा छंद हेच तिच्या शुद्ध आणि उत्कृष्ट भाषाशैलीचं मुख्य कारण आहे. गौरी स्वतःच वाचन करत नाही तर तिच्या मित्रमंडळी आणि चाहत्यांना सुद्धा ती वाचन करण्याचे आवाहन करत असते. यासाठी मालिकेच्या सेटवर असताना तिच्याकडे एखादे तरी पुस्तक असतंच. जेव्हा जेव्हा चित्रीकरण दरम्यान रिकामा वेळ मिळतो तेव्हा ती तो वेळ वाचन करण्यात घालवते. तिला साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक सर्वात जास्त आवडतं. सचिन पिळगांवकर यांचे 'हाच माझा मार्ग' हे पुस्तक सुद्धा तिच्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके पुं.ल. देशपांडे, प्रवीण दवणे आणि साने गुरुजी हे तिचे आवडते लेखक आहेत. भरपूर वाचनामुळे, तिची भाषा समृद्ध झालेली आहे. त्यामुळे तिच्याप्रमाणे आजच्या तरूण पिढीने पुस्तक वाचनाची आवड नक्की जोपासावी असं तिला वाटतं. 

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतून घडतंय मराठी संस्कृतीचं दर्शन

'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेचा विषय थोडासा हटके असल्यामुळे ही मालिका कमी वेळात टेलिव्हिजनवर लोकप्रिय झाली आहे. ही मालिका एक कॉमेडी मालिका असल्याने यातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होत आहे. खूप हसवत, कोपरखळ्या देत या मालिकेत मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा अभिमान राखण्याबाबत शिकवणसुद्धा दिली जात आहे. हलक्या फुलक्या मनोरंजक अशा या 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतून एक अनोखी प्रेमकथा या मालिकेत फुलत आहे. आदेश बांदेकर यांच्या 'सोहम प्रोडक्शन'मार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकेतील कलाकार हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलकारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

सुशांत सिंग राजपूतने दिला सारा अली खानसोबत काम करण्यास नकार

डिजीटल डेब्यूसाठी दिव्यांका त्रिपाठीचा HOT Makeover

सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय लोकांची पसंती