ऐश्वर्या रायची कॉपी मानसी नाईकने लग्नातही केला ऐश्वर्याचा जोधा लुक

ऐश्वर्या रायची कॉपी मानसी नाईकने लग्नातही केला ऐश्वर्याचा जोधा लुक

अभिनेत्री मानसी नाईक ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील खास फोटो आता व्हायरलही झाले आहेत. सोशल मीडियावर मानसी ऐश्वर्या रायची कॉपी म्हणून प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्याची मोठी फॅन असलेल्या मानसीने तिच्या लग्नातही तिच्यासारखेच दिसण्याचा प्रयत्न केला आहे असे या फोटोवरुन दिसून येत आहे. तुम्हाला ऐश्वर्याचा जोधा- अकबरमधील लुक आठवत असेल तर अगदी तसाच लुक मानसीने तिच्या लग्नासाठी केलेला दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून जाणून घेऊया मानसीच्या #manukishaddi स्पेशल काही खास गोष्टी

Good News: अभ्या अर्थात समीर परांजपे झाला बाबा, कन्यारत्नाचा जन्म

जोधपूर लुकमध्ये दिसली मानसी

Instagram

सेलिब्रिटी म्हटले की, ते त्यांच्या लग्नात नेमका कोणता लुक करणार याची उत्सुकता अनेकांना असते. 2021 पासून सेलिब्रिटी लग्नांची लगीनघाई सुरु झाली आहे. मानसी नाईकने तिच्या लग्नाची घोषणा केल्यापासूनच तिच्या इन्स्टा अकाऊंटवर वेगवेगळ्या सोहळ्याचे फोटो तिने शेअर केले आहे. तिच्या लग्नात ती नेमका कोणता लुक करेल याची उत्सुकता असतानाच तिचे लग्नातील काही फोटो व्हायरल होऊ लागले. मानसीने तिच्या लग्नासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा जोधा-अकबरमधील ब्राईडल लुक केला आहे. मानसीने लग्नासाठी राणी रंगाचा लेहंगा घातला होता आणि हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हेवी ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या या संपूर्ण लुकमध्ये ती ऐश्वर्या रायसारखीच सुंदर आणि नाजूक दिसत होती. तिच्या लग्नाील अनेक फोटो व्हायरल झाले असून तिच्या लग्नात तिने खूपच धमाल केलेली दिसत आहे.

Insragram

मेंदी आणि ग्रहमखामध्येही तशीच स्टाईल

Instagram

मानसी नाईक ही ऐश्वर्या रायच्या सौंदर्याने फारच प्रेरित दिसते. कारण तिने तिच्या लग्नसोहळ्यासाठी बऱ्यापैकी ऐश्वर्याच्या जुन्या काही चित्रपटांची स्टाईल केलेली दिसत आहे. तिच्या ग्रहमखातील साडी आणि गळ्यातील चोकर सेट ‘हम दिल दे चुके सनम’ मधील ऐश्वर्याची आठवण करुन देतो. लग्न झाल्यानंतर ऐश्वर्याचा जसा लुक होता अगदी तसाच लुक तिने ग्रहमखाला केलेला आहे. तर मेंदीच्या कार्यक्रमात तिने घातलेला पिस्ता रंगाचा स्कर्ट आणि ब्लाऊजही ऐश्वर्याच्या लुकची आठवण करुन देतो.

माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' फेम अभिनेत्री प्राजक्ता परब अडकली विवाहबंधनात

दिपालीचा खास डान्स

मानसीचे लग्न तिच्या खास मित्रांच्या उपस्थितीत पार पडले आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरु झाल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना अभिनेत्री दिपाली सय्यद आणि अभिमेत्री सीमा कदम या दोघी तिच्या प्रत्येक सोहळ्यात दिसल्या आहेत. अगदी स्पिन्टर पार्टीपासून या सगळ्या एकत्र धमाल करताना दिसत आहेत. दिपालीने तिच्या लग्नातील मेंदी या कार्यक्रमासाठी खास डान्स परफॉर्मन्सही केला. तिचा लग्नसोहळा लक्षात राहावा असा करण्यासाठी त्यांनी खूपच मेहनत केलेली दिसत आहे.  दिपालीने या लग्नासाठी लाल- गोल्डन रंगाचा लेहंगा आणि सीमा निळ्या रंगाच्या लेंहग्यात दिसली.  तिच्या या दोन्ही जवळच्या मैत्रिणींनी तिच्या लग्नातील खास क्षण पोस्ट केले आहेत 


POPxo मराठीकडून मानसी नाईक आणि प्रदीप खरेराला लग्नाच्या शुभेच्छा!

अभिनेत्री मानसी नाईकच्या ग्रहमखाचे खास फोटो, लग्नाच्या विधींना सुरूवात

Skin Care

MyGlamm GLOW Iridescent Brightening Eye Cream

INR 1,195 AT MyGlamm