‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' फेम अभिनेत्री प्राजक्ता परब अडकली विवाहबंधनात

‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' फेम अभिनेत्री प्राजक्ता परब अडकली विवाहबंधनात

शुद्ध देशी मराठीच्या ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता उमेश परब लग्नबंधनात अडकली आहे. प्राजक्ताने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आपल्या हळदीचे फोटोही तिने शेअर केले आहे. अगदी बाहुलीसारखी दिसणाऱ्या प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत आहेत. काही तासांपूर्वीच तिने हे फोटो पोस्ट केले असून या फोटोजना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत जणू काही लग्नाचं वारंच परसलं आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्राजक्ताने खूप कमी वेळात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. ललित 205, प्रेम करा पण मराठीत यासारख्या मालिकेतून प्राजक्ता आपल्या भेटीला आली आहे. आता अभिनयाबरोबर प्राजक्ताची नव्या इनिंगलाही सुरूवात झाली आहे. तिच्या चाहत्यांनी तिला पुढील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री मानसी नाईकच्या ग्रहमखाचे खास फोटो, लग्नाच्या विधींना सुरूवात

प्राजक्ताचे रूप जणू काही बाहुलीच

प्राजक्ताने आपल्या हळदीचे आणि मेंदीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून एखाद्या  बाहुलीप्रमाणे नाजूक दिसत आहे. हळदीच्या कपड्यांमध्ये असणारी फ्लोरल ज्वेलरी तर तिच्या सौंदर्यामध्ये  अधिकच भर घालत आहे असं म्हणता येईल. प्राजक्ताचे फोटो अत्यंत सुंदर दिसत असून प्राजक्ता खूपच आनंदी दिसत आहे. तर तिच्या लग्नाचे फोटोही अगदी मनमोहक आणि लक्षवेधक आहेत. पारंपरिक दागिने, हेअरस्टाईल आणि अगदी तिला साजेल असा शालू परिधान प्राजक्ताने केला होता. तिचा हा लुक अघदी तिच्यातील नववधू आणि तिच्यातील अल्लडपणा शोभून दिसेल असाच आहे. प्राजक्ताला बघितल्यानंतर एक प्रसन्नता जाणवते आणि तिच्या लग्नातही ती तितकीच सुंदर दिसत होती. नऊवारी साडीचा साज ल्यालेली प्राजक्ताचे सौंदर्य नक्कीच तिच्या  चाहत्यांना भावले आहे. मराठमोळा लुक करून  प्राजक्ताने सर्वांचेच मन जिंकून घेतले असल्याचे दिसून येत आहे.  

लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार नागिन फेम मौनी रॉय

दिग्दर्शक अंकुश मरोडेसह विवाहबद्ध

प्राजक्ता परबचा नवरा कोण अशी उत्सुकता तिच्या चाहत्यांना असेल तर प्राजक्ताने अंकुश मरोडेसह लग्न केले असून अंकुशने पत्रकारिता केली असून तो एक उत्तम दिग्दर्शकही आहे. प्राजक्ताने आपल्या साखरपुड्याचा व्हिडिओदेखील याआधी शेअर केला होता.  तर अंकुश आणि प्राजक्ताच्या नावाचा हॅशटॅग तिने #Pran असा दिला आहे. प्राजक्ताने 9 जानेवारी रोजी लग्न केले असून लग्नाचे फोटो मात्र आता शेअर केले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना अचानक लग्न करून तिने नक्कीच सुखद धक्का दिला आहे. तिच्या या नववधू वेशातील मनमोहक आणि मराठमोळ्या फोटोंना सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्रमैत्रिणी लाईक आणि कमेंट्स  स्वरूपात भरभरून शुभेच्छा देत आहेत. तर प्राजक्ताही त्याला रिप्लाय देत शुभेच्छांचा स्वीकार करत आहे. दरम्यान प्राजक्ता सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करताना दिसून येत नसली तरीही लवकरच मालिका अथवा चित्रपटात दिसेल अशी तिच्या  चाहत्यांना आशा आहे. 

‘POPxo मराठी’ कडून प्राजक्ता आणि अंकुशला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Bigg Boss 14 : राहुल वैद्यला सतत केलं जातंय टार्गेट, मेकर्सवर फॅन्स नाराज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक