#IndependeceDay2019 निमित्त मराठी कलाकारांचं वैशिष्ट्यपूर्ण सेलिब्रेशन

#IndependeceDay2019 निमित्त मराठी कलाकारांचं वैशिष्ट्यपूर्ण सेलिब्रेशन

सर्वप्रथम #POPxo मराठीच्या सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूपच खास आहे कारण या वर्षी दोन सण एकत्र आले आहेत. एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आहे तर दुसरीकडे रक्षाबंधनाची धूम आहे. त्यामुळे यंदाचा 73 वा स्वातंत्र्यदिन सगळ्या भारतीय बांधवांसाठी खूपच खास आहे. या दिनाच्या निमित्ताने अनेक मराठी आणि बॉलीवूड सेलेब्सनीही शुभेच्छा सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या वर्षी शुभेच्छांमधील नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे काही मराठी सेलेब्सनी तर डान्स परफॉर्मन्स आणि गाणं गाऊन या शुभेच्छा दिल्या आहेत. चला पाहूया कोणत्या कोणत्या सेलेब्सनी दिल्या आहेत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. 

महेश टिळेकरांचा सीमेवरील जवानांसाठी खास कार्यक्रम

मराठी तारका हा सुंदर कार्यक्रम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी खास स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून सीमेवरील जवानांसाठी खास बारामुल्ला, कारगिल आणि सियाचीन येथे जाऊन मोफत मराठी तारका हा कार्यक्रम सादर केला. तेव्हा या कार्यक्रमामुळे जवानांच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य आणि आनंद अवर्णनीय आहे.

सिद्धार्थ म्हणजेच शशांक केतकरचं ऑस्ट्रेलियामध्ये सेलिब्रेशन

'हे मन बावरे' मधील सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर हा सध्या ऑस्ट्रेलियाला आहे. पण तिथे गेल्यावर त्याने उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा हा व्हिडिओ

स्वातंत्र्यदिनासाठी खास नृत्याविष्कार

अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या नृत्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. उर्मिला नेहमीच प्रत्येक सणाला नृत्य किंवा तिची गोड मुलगी जिजाच्या बाललीलांचे व्हिडिओ शेअर करत असते. पाहा उर्मिलाचा हा खास स्वातंत्र्यदिनानिमित्तचा नृत्याविष्कार

प्रसाद ओकची खास उपस्थिती

मराठी अभिनेता प्रसाद ओकने या दिवशी खास व्हिडिओ शेअर केला आहे तो त्याच्या मुलाचा मयांक ओकचा. या इन्स्टापोस्टमध्ये प्रसाद मुलाच्या शाळेतील स्वातंत्र्यदिनानिमित्तची परेड आणि मुलाच्या आग्रहामुळे शाळेत हजेरी लावण्याबद्दलची मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या मुलाला वेळ देण्यासाठी कार्यक्रमाला पोचलेल्या बाबाची ही पोस्ट खूपच छान आहे.

अभिनेत्री दिप्ती केतकरनेही आपल्या मुलाच्या खास स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

अभिनेता सुनील बर्वे यांनीही झेंडावंदनाचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. 

तर आजच्या दिवसाच औचित्य साधून 'कुसुम मनोहर लेले' या नाटकाचं टिझर रिलीज करण्यात आलं आहे.