मराठीतील या कलाकारांनी वजन कमी करण्यासाठी घेतली विशेष मेहनत

मराठीतील या कलाकारांनी वजन कमी करण्यासाठी घेतली विशेष मेहनत

सेलिब्रिटींनी नेहमीच परफेक्ट दिसायला सगळ्यांनाच वाटते. पण काही कारणास्तव आणि लाईफस्टाईल बदलल्यामुळे त्यांचेही वजन वाढते. पण सेलिब्रिटी स्क्रिनवर थोड्या जाड्या दिसू लागल्या की, त्यांना लगेच ट्रोल केले जाते. हिंदीतच नाही तर मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांना त्यांच्या वजनावरुन अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. पण त्यांनी हार न मानता आपले वजन कमी करत पुन्हा एकदा हवा तो लुक साध्य केला आहे. जाणून घेऊया अशाच काही मराठी सेलिब्रिटीबद्दल ज्यांनी वजन कमी करण्यासाठी आतापर्यंत बरीच मेहनत घेतली आहे.

गळ्यात मंगळसूत्र दिसल्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चेला उधाण, फोटो व्हायरल

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील अभिनेत्री रसिका सुनील हिचे अनेक चाहते आहेत. मालिकेतील तिचा हॉट आणि सिझलिंग असा अंदाज अनेकांना आवडतो. पण मालिकेत काम करतानात तिचेही वजन वाढले होते. अचानक तिने मालिका सोडली. पण मालिका सोडल्यानंतर तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तिने तिच्या शरीराची विशेष काळजी घेत वजन  नियंत्रणात आणले. रसिका सुनीलने कमबॅक केल्यानंतर अनेकांना तिच्याकडे पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. पण  तिचा हा नवा लुक अनेकांना खूपच आवडला. रसिकाने मालिका जॉईन करण्यापूर्वी काही हॉट फोटोशूट केले होते. जे अनेकांना आवडले होते. 

सई ताम्हणकर

Instagram

सई ताम्हणकर ही मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.आताची सई आणि पूर्वीची सई यामध्ये बराच फरक पडला आहे. सईने एका चित्रपटासाठी आपले वजन वाढवले होते. पण त्या चित्रपटानंतर तिने वर्कआऊट आणि सुंदर शरीर फारच मनावर घेतले आहे. कारण सईमध्ये बराच फरक पडला आहे. सईने कमालीचे वजन कमी केले असून ती आता बरीच वेगळी दिसते. तिचा हा लुक अनेकांना आवडेल असा आहे. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत सई ही एक आदर्श आहे असे म्हणावे लागेल.

आपल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेची भावपूर्ण पोस्ट

प्रिया बापट

Instagram

प्रिया बापट ही ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन सुंदरच दिसते. वजनदार या चित्रपटासाठी सई आणि प्रियाने वजन वाढवले होते. पण या चित्रपटासाठी वजन वाढवले होते. पण या चित्रपटानंतर तिने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. आताही लॉकडाऊनमध्ये तिने फिटनेसकडे जास्तीत जास्त लक्ष दिले. तिचीही मेहनत नेहमीच दिसून आली आहे. प्रिया घरचा आहार तिच्या डाएटमध्ये घेते त्यामुळेच ती इतकी फिट आणि तिची स्किन चांगली आहे.

स्पृहा जोशी

Instagram

उत्तम अभिनय अशी ओळख असलेली अभिनेत्री स्पृहा देखील वजन वाढल्यामुळे ट्रोल झाली होती.तिच्या वजन वाढण्याचे कारण जाणून घेण्यापेक्षाही ती स्क्रिनवर जाड दिसते असे अनेकांचे म्हणणे होते. पण  त्यानंतर तिने तिचे वाढते वजन नियंत्रणात आणले. नियमित व्यायाम करत तिने आपले ध्येय साध्य करत योग्य शरीर कमावले आहे. 


हे आहेत काही मराठी सेलिब्रिटी ज्यांनी त्यांचा लुक अधिक चांगला करण्यासाठी वजन नियंत्रणात आणले.

प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात