या मालिकांचे थांबणार चित्रीकरण, प्रेक्षकांना बघावे लागणार जुने एपिसोड्स

या मालिकांचे थांबणार चित्रीकरण, प्रेक्षकांना बघावे लागणार जुने एपिसोड्स

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात मनोरंजन क्षेत्राने बरेच काही सोसले आहे. आता आता कुठे चित्रीकरणाला परवानगी मिळालेली असताना आता पुन्हा एकदा चित्रीकरणाला लाल सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक मालिकांचे चित्रिकरण हे काही काळासाठी पुन्हा एकदा थांबवण्यात आले आहेत. देशात सुरु असलेली लॉकडाऊन परिस्थिती पाहता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठीच शूटिंगला परवानगी नाकारण्यात आली आहे. याचा फटका अनेक हिंदी- मराठी मालिकांना बसणार आहे. काही मराठी मालिकांंचे चित्रीकरण पूर्णत: थांबले असून आता प्रेक्षकांना या मालिकांचे काही जुने एपिसोड्स पाहावे लागणार आहेत. पण त्यावरही शक्कल काढून मालिकांचे शूटिंग हे महाराष्ट्राबाहेर सुरु राहणार आहे. जाणून घेऊया चित्रिकरणाचा फटका नेमका कोणत्या मालिकांना बसला आहे ते

रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेस'मधून अजय देवगन करणार डिजिटल डेब्यू

महाराष्ट्रातील मालिकांचे चित्रीकरण बंद

मराठीमध्ये सध्या अनेक नव्या दर्जेदार मालिका सुरु आहेत. मराठीतील अनेक मालिकांचे शूटिंग हे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरु आहे. स्टारप्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांवर मालिकांचा धडाका सुरु असतो. अनेक नव्या मालिका या वाहिनींच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. ‘आई कुठे काय करते?’ , ‘रंग माझा वेगळा’, ‘अग्गं बाई सूनबाई’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ अशा काही मालिकांचा यामध्ये समावेश आहे. मालिका आणि त्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत काही मालिकांनी आपला सेट हलवल्याचेही लक्षात आले आहे. महाराष्ट्राबाहेर पडत काहींनी शूट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीतील काही मालिका सध्या फारच रंजक अशा वळणावर असताना त्यांना बंद करणे हे मालिकाकर्त्यांनाही रुचलेले नाही. 

गोव्याला मिळाली पसंती

स्टार प्रवाहवरील काही मालिका या सध्या चांगल्याच रंजक वळणावर आहेत.असे असताना मालिका ही प्रेक्षकांपासून तुटू नये म्हणूनच मालिकांची शूटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वाहिनीने गोव्याची निवड केली आहे. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात सध्या काही मालिकांचे शूटिंग सुरु राहणार आहे. त्यामुळे या मालिकांच्या एंटरटेन्मेंटमध्ये मुळीच ब्रेक लागणार नाही. लॉकडाऊनमध्ये घरी राहून या मालिकांचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. यामध्ये ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं?’ ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांचे सेट गोव्यामध्ये आधीच स्थलांतरीत झाले आहेत

एक नारळ दिलाय' म्हणत रितेशने शेअर केला हा व्हिडिओ

काही मालिकांनी सुरु केले रिपीट एपिसोड

प्रेक्षकांमध्ये आणि मालिकांमध्ये दुरावा येऊ नये म्हणून काही मालिकांनी शूट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी कोरोनाची खबरदारी घेत काही निर्णय घ्यावे लागत आहेत. काही मालिकांनी सगळ्यांची काळजी घेत शूटिंग सुरु ठेवले आहे. तर काही मालिकांनी मात्र शूटिंग थांबवले आहे. झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका आता पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरु करण्यात आली आहे. बुधवारी या मालिकेचा पहिला एपिसोडपासून सुरुवात करण्यात आली आहे. अद्याप इतर कोणत्या मालिकांचे रिपीट एपिसोड सुरु झालेले नाही. पण पोस्ट प्रोडक्शन आणि शूटिंग या सगळ्यांचीच परवानगी नाकारल्यामुळे आता काही दिवसांनी काही मालिकांचे रिपीट एपिसोड सुरु होतील.

 

दरम्यान शूटिंगसाठी गोवा हे नवे हॉटस्पॉट झाले असून या ठिकाणी खबरदारी घेत शूट सुरु राहणार आहे 

भगवान श्रीरामाची भूमिका साकारून हे कलाकार झाले प्रसिद्ध