सोशल मीडियामुळे कधी कोण प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. असाच सध्या अनुभव घेतोय तो म्हणजे मराठमोळा गायक नचिकेत लेले. ‘इंडियन आयडल’ हा प्रसिद्ध गाण्याचा रियालिटी शो आहे आणि आतापर्यंत कोणत्याही स्पर्धकाने नचिकेतप्रमाणे या मंचावर गाणे गायलेले नाही. नचिकेतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शनिवार आणि रविवारी घेण्यात आलेल्या मेगा राऊंडमध्ये नचिकेतने मराठी नाट्यसंगीत गाऊन पहिल्या 15 स्पर्धकांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. पण अगदी वेगळ्या अंदाजात नचिकेतने हे गाणं गायल्यामुळे प्रेक्षक तर भारावून गेलेच पण परीक्षकही अचंबित झाले. नचिकेतच्या गाण्यावरील आणि गाण्याच्या अभ्यासावरील प्रेमाला परीक्षकांनीही सन्मानाने दाद दिली.
नचिकेत लेले हा सध्या स्पर्धक म्हणून रियालिटी शो मध्ये आला आहे. पहिल्या पंधरा स्पर्धकांची निवड करण्यासाठी होणाऱ्या राऊंडमध्ये नचिकेतने अप्रतिम गाणे गायले. त्यानंतर परीक्षकांनी त्याचे नाट्यसंगीत प्रेम आणि त्याची आवड बघून आशा व्यक्त केली की त्याला एखाद्या वेळी अशा वेषभूषेत पाहून त्याचे गाणे ऐकावे. नचिकेतने जराही वेळ न दवडता पुढच्याच राऊंडमध्ये परीक्षकांची ही इच्छा पूर्ण केली. बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील नावाजलेले कलाकार. आजपर्यंत पुरूषाने अशी केलेली स्त्री वेषभूषा कोणालाही जमली नाही असं म्हटलं जातं. नचिकेत स्टेजवर आल्यानंतर त्याला सर्वप्रथम कोणीही ओळखलं नाही. स्त्री वेषभूषेतही इतका अप्रतिम दिसणारा नचिकेत खूपच सुंदर दिसत होता आणि त्यानंतर त्याने गायलेले बालगंधर्वांचे संगीत हे त्यावर अधिक मोहून टाकणारे आणि मंत्रमुग्ध करणारे होते हे निश्चित. त्याच्या या अदाकारीला सर्वच परीक्षकांनी मनापासून दाद दिली. इतकंच नाही तर त्याच्या गाण्याची आणि या परफॉर्मन्सची क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनाही नचिकेत लेलेचा आवाज आणि त्याची ही अदाकारी खूपच भावली असल्याचे दिसून आले आहे.
ड्रग्ज प्रकरणातून सुटका मिळाल्यानंतर भारती सिंह परतली कपिल शर्मा सेटवर
नचिकेतला लहानपणापासून एअरक्राफ्टची आवड होती. त्यामुळे त्याने एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग पूर्ण केले. मात्र त्याला त्याच्यातील गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने यावर्षी रियालिटी शो मध्ये आपलं नशीब आजमावण्याचे ठरवले. मागच्या वर्षी स्टेज गाजवलेल्या मराठमोळ्या रोहित राऊतने त्याची यावर्षी ओळख करून दिली. ‘तुम जो मिल गए हो’ या पहिल्याच गाण्याने नचिकेतने परीक्षकांचे मन जिंकून घेतले आणि पुढच्या राऊंडसाठी त्याची निवड झाली. आता तर त्याने आपल्या परफॉर्मन्सने संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. इतका सुंदर परफॉर्मन्स दिल्यानंतर आता पुढे नक्की नचिकेत काय काय वेगळं घेऊन येणार आहे याची नक्कीच सगळे उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी रोहितला ही ट्रॉफी मिळवता आली नाही. मात्र यावर्षी नचिकेतला ही ट्रॉफी मिळावी अशीच अपेक्षा आता प्रेक्षक करत आहेत. नचिकेतचा आवाज आणि त्याची बोलण्याची ढब आता सर्वांनाच भुरळ घालायला लागली आहे हे निश्चित.
मुंबई एअरपोर्टवर हरवले जुही चावलाचे डायमंडचे कानातले, शोधण्यासाठी मागितली मदत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक