New series: कांंबले साहब को पता है... आला 'पांडू'चा ट्रेलर

New series: कांंबले साहब को पता है... आला 'पांडू'चा ट्रेलर

वेबसीरिजचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मराठीमध्ये एक नवी सीरिज लवकरच येणार आहे. ‘पांडू’ असे याचे नाव असून नुकतेच त्याचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले आहे. पोलिसांवर आधारीत अशी ही सीरिज असून एक कर्तव्यनिष्ठ पण कोणत्यातरी पेचात अडकलेला पोलीस इनस्पेक्टर यात दाखवण्यात आला आहे. एकूणच पोलिसाचे जीवन दाखवणारी ही सीरिज असून कांबळे नावाचा इन्स्पेक्टर यात दाखवण्यात आला आहे.

आलियाला सोडून रणबीर सतत दिसतोय एक्स गर्लफ्रेंड्ससोबत

उद्विग्न पोलीस अधिकारी

पोलिसांच्या जीवनावर आधारीत अशी ही सीरिज असून पोलिसांचे व्याप आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. यातही कांबळे नावाचा पोलीस असून त्याच्या आयुष्यात सगळे काही चांगले सुरु आहे. पण तरीदेखील त्याला काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे. तो आयुष्यात काही तरी वेगळ्याच्या शोधात असल्याचे दिसत आहे.

ट्रेलर फारच संथ

पोलिसांच्या जीवनावर आतापर्यंत अनेक काही आलेले आहे. आता वेबसीरिजच्या माध्यमातून आणि मराठीत हा विषय घेण्यात आला आहे. पोलिसाच्या आयुष्यात होणारी द्विधा मन:स्थिती दाखवताना होणारा विनोद दाखवण्याचा प्रयत्न ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे खरा पण याचा ट्रेलर फारच संथ आहे. त्यामुळेच यात काही नवीन नसल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. सुहास शिरसाट यामध्ये कांबळे नावाच्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असून तृप्ती खामकर, अभिष मॅथ्यू, दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Nach baliye 9च्या सेटवर मनीष पॉलमुळे रवीना झाली नाराज

20 सप्टेंबरला होणार रिलीज

भाडिपा आणि Mx player ची निर्मिती असलेली ही सीरिज असून येत्या 20 सप्टेंबरला ही सीरिज रिलीज होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर ट्रेलर पाहून उत्सुकता वाटली असेल तर तुम्ही ही सीरिज नक्कीच पाहायला हवी. जर तुम्ही ट्रेलर पाहून असंतुष्ट असाल तरी देखील ते पाहण्यास काहीच हरकत नाही.

सुहास शिरसाट वेगळया भूमिकेत

Instagram

नरसोबाची वाडी, फँड्री, रिंगण, टपाल अशा चित्रपटात सुहासने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. सध्या तो  झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत दत्ता नावाची भूमिका बजावत आहे आणि आता तो वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे. या शिवाय भाडिपाची कॉमेडी क्वीन तृप्ती खामकर सुहास शिरसाटच्या पत्नीची भूमिका या मालिकेत बजावत आहे. 

भारती सिंह लवकरच देणार Good News, आई होण्याची आहे इच्छा

वेबसीरिज असतातच खास

हल्लीचा काळ हा फक्त वेबसीरिजचा आहे. तुम्हालाही वेबसीरिज पाहायला आवडत अससीत तर तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयाच्या आणि आशयाच्या वेबसीरिज आहेत. मराठीतही आता चांगल्या वेबसीरिज येऊ लागल्या आहेत आणि तुम्ही आवर्जून पाहायला हव्यात. 


सध्या तरी पांडू या वेबसीरिजचे ट्रेलर आले असून तुम्ही ही नवी मराठी वेबसीरिज नक्की पाहायला हवी. 

*खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.