Masaba Masaba Review:नीना गुप्ता आणि मसाबाचे खासगी आयुष्य उलगडणारी सीरिज

Masaba Masaba Review:नीना गुप्ता आणि मसाबाचे खासगी आयुष्य उलगडणारी सीरिज

इतरांच्या आयुष्यात झाकून पाहायला कोणाला आवडत नाही. त्यातल्या त्यात सेलिब्रिटींचे आयुष्य हे नेहमीच वेगवेगळ्या गॉसिप्सने भरलेले असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी मसाबा गुप्ता या कायमच वेगळ्या होत्या. नीना गुप्ता यांची एकमेव मुलगी असलेली मसाबा आज मोठी फॅशन डिझायनर आहे. पण तिच्या जन्मापासूनच ती चर्चेत आहे ते केवळ विवियन रिचर्ड हे तिचे वडील असल्यामुळे आणि त्यांच्यासारखीच ती दिसत असल्यामुळे. मसाबाचे आयुष्य आता सुखकर वाटत असले तरी तिच्या आयुष्यातही अनेक चढ- उतार आले ते आयुष्या दाखवण्याचा प्रयत्न Masaba Masaba मध्ये करण्यात आला आहे.

रतन राजपूतचे पुनरागमन, संतोषी मातेच्या अंश रूपात मालिकेत येणार परत

संघर्षाची कहाणी

Instagram

सेलिब्रिटींचे आयुष्य हे खूप चांगले असते असे वाटत असले तरी त्यांच्या आयुष्यात प्रसिद्धी वगळताही इतर गोष्टी असतात. लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अपेक्षा त्यांना वेळोवेळी तणावाखाली आणत असते. नीना गुप्ता आणि मसाबा या इंडस्ट्रीतील अशा दोन महिला आहेत ज्यांनी नाव कमावले, गमावले आणि पुन्हा उभं राहून आपली जागा निर्माण केली. मसाबा ही फॅसन डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे अनेक कलेक्शन प्रसिद्ध आहेत. पण बॉलिवूडसाठी कपडे डिझाईन करणं, सेलिब्रिटींनी खूश ठेवणे… या इंडस्ट्रीमध्ये तग धरण्यासाठी काही गोष्टी मनाविरुद्ध करणं हे देखील यामध्ये दाखवण्यात आले आहे. 

रिलेशनशीप स्टेटस जो सेलिब्रिटींच्या चर्चेचा विषय असतो त्याबाबतीतही मसाबाचे आयुष्य अपसाईड डाऊन कसे होते ते दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे जो सोशल मीडिया आपल्यासाठी इतरांच्या आयुष्यात पाहण्यासाठीचे उत्तम माध्यम आहे तेच माध्यम सेलिब्रिटींसाठी कशी डोकेदुखी आहे हे देखील यामध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अगदी पहिल्या एपिसोडपासून ही सीरिज तुम्हाला रोखून धरते. 

नीना गुप्ता यांचा मसाबाला घडवण्यात एक मोठा वाटा आहे. एक क्रिकेटरशी प्रेम करुन लग्न करता आई झालेल्या नीना गुप्ता यांनी समाजाचा कोणताही रोष न स्विकारता आपल्या मुलीला वाढवले. तिला स्वातंत्र्य दिले. तिला घडवले. चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळवलेल्या नीना गुप्ता यांना चित्रपटात पुन्हा काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागली. हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. उत्तम अभिनय असूनही नीना गुप्ता यांना चित्रपटात काम मिळत नव्हते. पण ‘बधाई हो’ या चित्रपटातून त्यांनी कमबॅक करत पुन्हा एकदा चित्रपटात काम मिळवले.  सीझन 1 हा एका अशा टप्प्यावर येऊन थांबला आहे की आता याचा दुसरा सीझन कधी येईल याची उत्सुकता आहे.

नेहा कक्करला पु्न्हा लागले आहेत लग्नाचे वेध, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना


नीना गुप्ता आणि मसाबा यांच्या खासगी आयुष्यावर आधारीत अशा सीरिजला त्यामुळेतच नेटफ्लिक्सवर जास्त प्रसिद्धी मिळत आहे. ही मालिका सध्या भारतातील पहिल्या क्रमांकावर असून जर तुम्ही अजून ही सीरिज पाहिली नसेल तर तुम्ही ती नक्कीच पाहायला हवी.

रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री, केले ट्विट