प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींनी करा फॉलो

प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींनी करा फॉलो

आईबाबा होणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखद काळ असतो. गरोदरपणापासून बाळाचा जन्म होईपर्यंत घरात अनेक गोष्टी प्लॅन केल्या जातात. एका छोट्याशा गोष्टीमुळे घरात जणू आनंदाची दिवाळीच सुरू होते. मात्र आनंदासोबतच हा काळ प्रत्येक स्त्रीसाठी आव्हानात्मकही असतो. कारण या काळात स्त्रीयांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात अनेक बदल होतात. अर्थातच जस जसे गरोदरपणाचे महिने वाढू लागतात तस तसे त्यांच्या शरीरात पोटाचा घेर वाढणं आणि इतर बदल जाणवू लागतात. अर्थातच या काळात त्यांना त्यांचे जुने कपडे येत नाहीत. खरंतर आतापर्यंत या काळात साधे, सुती, आरामदायक आणि  ढगळ कपडे घालण्याची पद्धत होती. पण अशा कपड्यांमुळे अनेकींना उगाचच आपण आजारी आहोत असं वाटू लागतं. शिवाय आता काळ बदलला आहे त्यामुळे या खास दिवसांसाठी बाजारात नवनवीन पॅर्टनचे मॅटर्निटी ड्रेस मिळतात. मग तुम्हाला या दिवसांमध्ये अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसायचं असेल तर तुम्ही करिना कपूर, अनुष्का शर्मा या बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे स्टाईल करू शकता. यासाठी जाणून घ्या या अभिनेत्रीच्या फॅशनेबल कपड्यांमधून घेतलेल्या काही स्टायलिंग टिप्स

करिना कपूर -

करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे हे सर्वांना माहीत असेलच. तैमूरच्या वेळी गरोदर असताना करिनाची मॅटर्निटी स्टाईल अनेकींनी कॉपी केली होती. ज्यामुळे करिना कपूर मॅटर्निटी स्टाईल हा एक नवा ट्रेंडच आता झाला आहे. यावेळीही करिना तिच्या स्टाईलने अनेकांना प्रेरणा देत आहे. लॉकडाऊन नंतर करिना तिची राहीलेली कामं गरोदरपणातही पूर्ण करत आहे. ज्यामुळे या काळात तिने घातलेले कपडे हे कोणत्याही प्रोफेशनल महिलेसाठी अथवा वर्किंग वुमनसाठी गरोदरपणी घालण्यासाठी प्रेरणा देणारेच आहेत. करिनाने या दुसऱ्या गरोदरपणात जास्तीत जास्त वन पीस ड्रेस आणि कप्तान असे कपडे परिधान केले आहेत.

अनुष्का शर्मा -

करिनाोबतच जर मॅटर्निटी स्टाईलमध्ये सध्या लोकप्रिय ठरत आहे ती अभिनेत्री आहे अनुष्का शर्मा. अनुष्का सध्या तिचे सर्व स्टाईल रेकॉर्ड तोडत प्रेगनन्सीचा काळ एन्जॉंय करत आहे. या काळातही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सतत तिचे नवनवीन लुक पोस्ट केले आहेत. ज्यात ती दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसत  आहे.  अनुष्काने या काळात शर्ट-स्कर्ट, डंगरी, लॉंग सूट, पजामा, वनपीस अशा अनेक प्रकारचे स्टायलिश कपडे घातले आहेत. जे तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता.

अमृता राव -

अमृता राव आणि आर जे अनमोल यांच्या घरी नुकतंच एका तान्हुल्याचं आगमन झालं आहे. आई होण्याआधी अमृता तिच्या प्रेगनन्सीच्या काळातही नेहमीप्रमाणेच सुंदर आणि स्टायलिश दिसत होती. तिने या काळात अगदी साडीतील पारंपरिक लुकही चाहत्यांसाठी पोस्ट केला होता. त्यामुळे जर तुम्हाला साडीची आवड असेल तर तुम्ही गरोदरपणी अमृताप्रमाणे साडीतही स्टायलिश दिसू शकता. 

आम्ही तुमच्यासोबत या बॉलीवूड अभिनेत्रींचे प्रेगनन्सींमधील काही लुक शेअर केले आहेत. हे लुक तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही त्यापैकी कोणता लुक कॅरी केला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm