‘माझा होशील ना' मालिकेत कोरोनामुळे वळण, सिंधू वहिनीभोवती फिरतेय मालिका

‘माझा होशील ना' मालिकेत कोरोनामुळे वळण, सिंधू वहिनीभोवती फिरतेय मालिका

कोरोनामुळे मालिकांच्या शूटिंगवर बऱ्यापैकी गदा आली आहे. गेल्यावर्षी मालिकांचे शूट पूर्णपणे थांबलेले होते. पण आता कुठे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिका पुन्हा एकदा पूर्ववत झाल्या होत्या तोच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे मालिकांच्या शूटिंगना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मोजकेच कलाकार घेऊन आता शूट सुरु आहे. त्यामुळे जो ट्रॅक सुरु होता. तो ट्रॅक सोडून आता थोडं भरकटल्यासारखं या मालिकांचं झालं आहे. आता ‘माझा होशील ना’ ही मालिकाच पाहा ना या मालिकेत आदित्य कश्यप या पात्राला तो खरा कोण आहे? हे कळण्याच्या आधीच मालिकेत सिंधू वहिनी नावाच्या पात्राने एंट्री घेतली आहे आणि आता याच पात्राचा बोलबाला सध्या सुरु आहे. या सिंधू वहिनीभोवती ही मालिका फिरत असून तिला चांगलीच पसंती मिळत आहे. 

सना खाननंतर आता आशका गोराडियाने घेतला अभिनयातून संन्यास

सिंधू वहिनीचा येतो राग राग

एखाद्या मालिकेत व्हिलनची एंट्री होत नाही तो पर्यंत ती मालिका म्हणावी तशी पाहण्याची इच्छा होत नाही. आता ‘माझा होशील ना या मालिकेत’ व्हिलन म्हणून अतुल परचुरेची एंट्री झाली होती. कंपनी आणि मालक असा एक वादही रंगताना दिसला होता. अगदी हनिमूनची टूर दाखवतानाही याचा अनुभव आला होता. पण मनालीवरुन घरी परतल्यानंतर या मालिकेतून जणू काही त्या व्हिलनची एक्झिटच झाली आहे असे वाटते. ( काही काळासाठी) कारण घरी आल्यानंतर फक्त एका घरातच ही मालिका स्तिमित झाली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरी राहायला आलेली सिंधू वहिनी दाखवण्यात आली आहे. गोरी गोमटी पण कपटी अशी ही सिंधू वहिनी आणि तिचे बाई बाई  बाई असे म्हणणे आता राग आणण्याचे कारण बनून गेले आहे. 

सासू- सून रंगणार वाद

आता सिंधू म्हणजेच सईची सासू आणि तिच्यात चांगलाच वाद रंगणार आहे. सईला पदोपदी त्रास देण्याचा तिने चंगच बांधला आहे असे दिसत आहे. त्यामुळे त्यांची आमनेसामने टक्कर झालेली कायम या मालिकेत पाहायला मिळत आहे. आदित्यचं गुपित जाणून घेण्यापेक्षा या मालिकेत जुंंपणारी जुगलबंदी ही कदाचित प्रेक्षकांना कांकणभर जास्तच आवडू लागली आहे असे साधारणपणे दिसत आहे. त्यामुळेच आता हा ट्रॅक थोड्या काळासाठी सुरु राहणार असे दिसत आहे. शिवाय कोरोनामुळे कमीत कमी कलाकारांमध्ये काम करण्याचा मालिकेचा हेतूही यामुळे सफल होत आहे हे दिसून येत आहे. 

आणखी एका अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम, दिले हे कारण

सिमा देशमुख यांना मिळतेय दाद

सिंधू जगदीश ब्रम्हे म्हणजेच घरातील दादा मामांची बायको असलेले हे पात्र अभिनेत्री सिमा देशमुख साकारत आहेत. या आधीही त्यांची मालिकेत सईच्या लग्नावेळी एंट्री झाली होती. पण तीही काही मिनिटांसाठी आणि एपिसोड पुरती असल्यामुळे पुढे जाऊन या मालिकेत या पात्रामुळे इतके वादळ उठेल असे काही वाटले नव्हते. पण आता मालिकेत या पात्रानेच जीव आणला आहे. सिमा देशमुख यांचे डायलॉग आणि त्यांचा अभिनय इतका सुरेख आहे की, प्रेक्षकांची त्यांना चांगलीच दाद मिळत आहे.

दरम्यान, कोरोनामुळे शूटिंगवर आणि कलाकारांच्या संख्येवर परिणाम झाला असला तरी देखील या मालिकेने घेतलेले सिंधू नावाचे वळण अनेकांचा फारच आवडलेले दिसत आहे.

नव्या चित्रपटासाठी मोनालिसा बागलचा Fit & Fine लुक