व्हर्च्युअल नामकरण सोहळा तुफान व्हायरल, सचिन देशपांडेची तुफान कल्पना

मुलीच्या नामकरण सोहळ्याची तुफान कल्पना, या अभिनेत्याने साजरा केला व्हर्च्युल सोहळा

काहीच दिवसांपूर्वी आपण बाबा झाल्याची आनंदाची बाबा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navryachi Bayko) फेम अभिनेता सचिन देशपांडे याने शेअर केली होती. त्याच्यावर त्याच्या मित्रमैत्रिणींनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता. सचिनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे आणि तो अगदी घराघरात पोहचला आहे. पण आता सचिन एका वेगळ्याच कारणासाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा सचिनने व्हर्च्युअली केला असून त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. अशी भन्नाट कल्पना सचिन आणि त्याची पत्नी पियुषाने लढवली आहे आणि त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सेलिब्रिटी नेहमी काही ना काहीतरी वेगळं करत असतात. पण अशा या नामकरण सोहळ्याचा व्हिडिओ खूपच मस्त असून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा अशी अभिनेता सचिन देशपांडेने (Actor Sachin Deshpande) विनंती केली आहे. पण व्हिडिओ इतका सुंदर आहे की, आपणहूनच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत अगदी न कंटाळता पाहतोच.

'अग्गंबाई सासूबाई' चा नवा सीझन, तेजश्री प्रधानच्या जागी येतेय नवी सूनबाई

कसा आहे हा व्हर्च्युअल नामकरण सोहळा

सध्या कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणालाही बोलावणे शक्य नाही. मात्र आपल्या आनंदात अशा तुफान कल्पनेतून सचिनने सर्वांना समाविष्ट करून घेतले आहे. सध्या कोरोनाच्या केस (Corona Case) वाढत आहेत आणि घरात लहान मूल असताना जोखीम घेणे नक्कीच कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे सचिन आणि त्याची पत्नी पियुषा यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा (Virtual Name Ceremony) पार पाडलेला दिसत आहे. सचिनने हा व्हिडिओ शेअर करताना सर्वांना आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे. ‘नमस्कार सध्याच्या covid परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत, म्हणूनच आमच्या परीचा Virtual नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकी ला आशीर्वाद ही नक्की द्या. आमंत्रक सचिन पियुषा’ सचिनने आपल्या बाहुलीचं नाव ‘मीरा’ असं ठेवलंय.

अदिती मलिकचं झालं डोहाळजेवण, मोहित मलिकने आनंद केला व्यक्त

डिसेंबर महिन्यात झाला मुलीचा जन्म

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm

सचिनने मीराचा जन्म झाला तेव्हा खास पोस्ट शेअर केली होती.  त्या पोस्टमधून सचिनचा आनंद झळकत होता. बाळाला पहिला महिना पूर्ण झाला तेव्हा आपल्याला मुलगी झाल्याचे सचिनने सांगितले होते. ‘24 dec 2020, गुरुवार ची सकाळ. आम्ही सगळेच उत्साह आणि काळजी हे भाव एकत्र चेहेऱ्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. काय होईल ह्याचा उत्साह होता तर सगळ नीट होईल ना ह्याची काळजी होती.

तसं बघितलं तर पियुषा आणि माझ्या बाबतीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या गुरुवारी च घडल्या आहेत. मग आमचा साखरपुडा असो, आमचं लग्न असो सगळं गुरुवारीच..पण हा गुरुवार जरा खास होता, खासच होता कारण ह्या गुरुवारी आमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडणार होती, आम्हाला पूर्ण करणारी व्यक्ती आयुष्यात येणार होती.

जवळपास अर्धा तास उलटून गेला होता पियुषा ला ऑपरेशन रूम मध्ये नेऊन, आणि माझे पेशन्स संपायला लागले होते. कधी कळणार कधी कळणार असं सारखं मनात व्हायला लागलं होतं आणि तेव्हढ्यात क्यां क्यां असा रडण्याचा आवाज ऑपरेशन रूम मधून आला, काय झालंय मुलगा की मुलगी? हे ऐकण्याच्या आधीच मी रडण्याचा आवाज ऐकून उड्या मारायला लागलो होतो. मी उड्या मारत असतानाच डॉक्टर आले आणि म्हणाले अभिनंदन "मुलगी झाली",

मी सांगूच शकत नाही की हे ऐकून मनात नक्की काय झालं होतं. पराकोटीचा आनंद काय असतो हे कदाचित शब्दात मांडता येत नसावं ते नुसतच अनुभवावं. आणि तो अनुभव मी त्या क्षणी घेत होतो. डॉक्टरांनी बाळाला आमच्या कडे दिलं आणि नकळत डोळ्यांत पाणी आलं. चेहेऱ्यावर खूप हसू, नुसतं उड्या मारणं आणि मनातून खुप भरून येणं असं सगळंच एकत्र मी करत होतो. हळू हळू जरा शांत झालो आणि मग बाळाला हातात घेतलं.

सचिन ते सचिन बाबा असा एक प्रवास पूर्ण झाला होता. बाप माणूस झालो होतो.. पण पियुषा अजून आत होती, cesarean झाल्यामुळे तिला वेळ लागणार होता. आणि तिला thank you म्हणण्यासाठी मी आतुर झालो होतो. मग जवळ पास एका तासाने पियुषा ला आत आणलं, खरंतर तिला घट्ट मिठी मारायची होती पण cesarean झाल्यामुळे ते शक्य नव्हत. जितका वेळ शक्य होईल तेवढं तिला thank you म्हणालो. दोघे ही खुप रडलो त्यादिवशी आणि त्या दिवसापासून आज पर्यंत almost रोज तीला thank you म्हणातोय. आमच्या बाळाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे, आज तीचा तसा एक महिन्याचा वाढदिवस आहे. मला आयुष्यभर पुरेल असा आनंद दिल्याबद्दल पियुषा तुला खूप खुप thank you आणि आमच्या बाळाला पहिल्या महिन्याचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..मुलगी झाली हो’

पुन्हा चालणार आलियाची जादू, आला 'गंगूबाई काठियावाडी' चा दमदार टीझर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक