'माझ्या नवऱ्याची बायको'चा येणार सिक्वल, या फोटोमुळे जोरदार चर्चा

'माझ्या नवऱ्याची बायको'चा येणार सिक्वल, या फोटोमुळे जोरदार चर्चा

आता कुठे या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तोच पुन्हा एकदा ही मालिका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मालिकेचा शेवट ज्या पद्धतीने करण्यात आला. त्यानंतर मालिकेमध्ये झालेल्या  अजून एका तिची म्हणजेच पती, पत्नी और वो (तिसरी) ची एंट्री ही चर्चेचा विषय ठरली. सध्या हा फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असून ही सिक्वलची तयारी असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हा फोटो आहे तरी काय आणि नेमकी ही मालिका सिक्वल रुपात येणार का नाही ते जाणून घेऊया. 

उर्मिला मातोंडकरचा कमबॅक, बारा वर्षांनंतर करणार चित्रपटात काम

अधिकृत घोषणा नाही

झी मराठीवर सध्या सगळ्या मालिकांचे सिक्वल येत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ‘अग्गंबाई सासुबाई’चा पुढचा भाग येत आहे. या मालिकांची अधिकृत घोषणा झाल्यामुळे टीआरपीच्या पहिल्या क्रमांकावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका देखील पुन्हा एकदा सुरु होईल असे अनेकांना वाटत आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागात श्रुती मराठेची ती अनोखी एंट्री आणि मालिकेचा शेवट बरेच काही सांगून जातो. गुरुनाथ आपल्या चुकांचा पाढा वाचत आपल्या बॅगा भरुन श्रुती सोबत निघून जातो.त्यामुळे ही मालिका अजून संपलेली नाही. असे दिसून येते. आता या मालिकेचा सिक्वल येऊही शकतो. पण या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने अखेर घेतला निरोप

रटाळ पण टीआरपी नंबर वन

या मालिकेवर आतापर्यंत अनेक मीम्स बनले आहेत. या मालिकेत आलेल्या काही स्थित्यंतरामुळे अनेकांना हसू आवरले नसेल. गुरुच्या आयुष्यात एकामागोमाग एक येणाऱ्या महिला आणि येणाऱ्या अडचणी पाहता प्रेक्षकांना फारच कंटाळा आला होता. ही मालिका कधी संपेल असे अनेकांना झाले होते.पण ही मालिका 2016 पासून प्राईम टाईममध्ये दाखवली जात होती. या मालिकेत शनाया दोनदा बदलल्या.तरीही ही मालिका अविरत सुरु होती. या मालिकेत दाखवण्यात आलेले काही बदल इतके विचित्र आणि मनाला न पटणारे असूनही या मालिकेचा एक फॅनबेस होता. ज्यामुळे ही मालिका तब्बल 4 वर्ष सुरु राहिली. रटाळ झाली तरी या मालिकेने टीआरपी काही सोडला नव्हता.

प्रियदर्शन जाधवने शेअर केलेल्या फोटोचे गूढ सुटले, लव - सुलभचे पोस्टर प्रदर्शित

सिक्वल आला तर

या मालिकेचा सिक्वल आला तर तो कसा असेल असा विचार केला तर  गुरुनाथ हा सुधरलेला असेल किंवा त्याच्या आयुष्यातील अफेअर्स तसेच सुरु असेल. राधिकाची माफी मागितली असली तरी देखील आपला बदला घेण्यााठी तो पुन्हा कधीही परतून वार करु शकतो हे या आधीही आपण पाहिले आहे. त्यामुळे सिक्वल आला तर या गोष्टी पुन्हा तशाच सुरु राहतील असे वाटते. या शिवाय या मालिकेतील पात्र बदलतील असेही वाटते. 

टायटल साँग झाले हिट

एखाद्या मालिकेची ओळख ही त्याच्या टायटल साँगवरुन होत असते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेेचे टायटल साँग हे तितकेच कमाल होते. वैशाली माडेच्या आवाजातील हे टायटल साँग फारच गाजले. याचा टायटल मोंटाजही तितकाच सुंदर होता. त्यामुळे हे गाणंही हिट झालं. 


आता या मालिकेचा सिक्वल खराच येणार असेल तर तुम्हाला तो पाहायला आवडेल का?