शनाया आणि राधिका एकत्र उभारणार विजयाची गुढी

शनाया आणि राधिका एकत्र उभारणार विजयाची गुढी

टेलिव्हिजनवरील मालिका आणि प्रेक्षक याचं नातं नेहमीच अतूट असतं. या मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे सीन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा यासाठी मालिकांमधून सणसमारंभ साजरे केलेले दाखवण्यात येतात. जसं नुकतंच एका मालिकेत गुढीपाडव्याचं महत्त्व सांगण्यात आलं. खरंतर सध्या देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. चित्रपटसृष्टी आणि मालिकांचं शूटिंगदेखील सध्या ठप्प आहे. मात्र मालिकांसाठी काही दिवस आधीच शूटिंग केलेलं असल्यामुळे टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांचे पुढील भाग सध्या प्रसारित केले जात आहेत. ज्यामुळे घरी बसलेल्या सर्वांनाच टेलिव्हिजनवर मालिकांची मेजवानी मिळत आहे. मराठी मालिकांमधील सर्वांची आवडती मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ गुढीपाडव्यानिमित्त या मालिकेत एक खास ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या या मालिकेसोबत गुढीपाडवा साजरा करता येणार आहे. 

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला नवं वळण

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने आता एक विलक्षण वळण घेतलं आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिल्या प्रमाणे माया गुरूच्या सांगण्यावरून राधिकाला ब्लॅकमेल करतेय. पण शनायामुळे राधिकाला गुरूचा सगळा प्लॅन कळतो. त्यानंतर शनाया राधिका एकमेकींची माफी मागतात आणि एकत्र येऊन गुरूला धडा शिकवायचं ठरवतात. ज्यामुळे एकमेंकीशी शत्रूप्रमाणे वागणाऱ्या या दोघी आता एकत्र येऊन गुरूला धडा शिकवणार आहेत. ठरलेल्या योजनेनुसार दोघीपण आता गुरूच्या प्रत्येक छोट्या- छोट्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. मायाला आपल्या बाजूने करून गुरूला चांगलाच धडा शिकवायचा असा राधिकाचा प्लॅन आहे. गुडीपाडवा हा मराठी नववर्षांचा पहिला दिवस असतो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात गुढी उभारण्यात येते. एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. एखाद्या शुभ कामाची सुरूवात करण्यासाठी हा उत्तम दिवस समजला जातो. ज्यामुळे याच दिवशी राधिका आणि शनाया गुरूला हरवण्याचा दिशेने पहिलं पाऊल उचलणार आहेत. या दोघी गुरूला कशी अद्दल घडवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. गुढीपाडवा स्पेशल या एपिसोडमध्ये या मालिकेला मिळालेलं हे नवीन वळण सर्वांना पाहता येणार आहे.  

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचं यश

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. या मालिकेने आतपर्यंत जवळजवळ 1100 भाग पूर्ण केले असून आणि आजवर या मालिकेने टीआरपीचे अनेक नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. या मालिकेतील दाखवण्यात येणारा राधिकाचा संघर्ष नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. ज्यामुळे आता या अन्यायाविरूद्ध राधिकाला आणि शनायाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

गुढीपाडवा सणाची माहिती आणि महत्त्व (Gudi Padwa Information In Marathi)

नववर्षाचं पर्व साजरं करा.. गुढीपाडवा शुभेच्छा संदेश द्या (Gudi Padwa Wishes In Marathi)

बिग बॉसच्या स्पर्धकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे केली तक्रार