हा #Hot सेलिब्रिटी करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण

हा  #Hot सेलिब्रिटी  करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण

बॉलीवूडमध्ये नवे चेहरे येतच असतात. पण एक असा नवा चेहरा बॉलीवूडच्या पदार्पणासाठी सज्ज झाला आहे ज्याला पाहून तुमच्या तोंडून #hot हा शब्द हमखास निघेल. या नव्या चेहऱ्याचे नाव आहे मिझान जाफ्री. आता तुम्हाला जाफ्री नावावरुन काही आठवत असेल तर ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला जावेद आणि नावेद जाफ्री आठवले असतील तर मिझान जाफ्री हा जावेद जाफ्रीचा मुलगा आहे. तो बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाला असून त्याच्या Hotnessचे अनेकजण आतापासूनच फॅन झाले आहेत.


‘मलाल’मधून करतोय पदार्पण


malal %282%29


मिझान ‘मलाल’ या चित्रपटातून पदार्पण करत असून काहीच दिवसांपूर्वी मलालचे पोस्टर त्याने त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केले होते.. हे पोस्टर आल्यानंतर हा नवा मुलगा कोण? या बद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. पण त्याचा लुक पाहिल्यानंतर तो हँडसम आहे अशीच प्रतिक्रिया उमटते. मलाल या चित्रपटात दोन नवे चेहरे  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शर्मिन सेहगल आणि मिझान ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणार आहे. मिझानने जाफ्री हे नाव लावलेले नाही. त्यामुळे आधी हा कोण कळत नव्हते. पण त्याने जावेद जाफ्रीसोबतचा फोटो शेअर केला आणि हा जावेद जाफ्रीचा मुलगा आहे हे सगळ्यांना कळले.


सलमानच्या फॅनने भारतसाठी बूक केलं संपूर्ण थिएटर


ट्रेलरमधून अनेकांना आवडतोय  मिझान
 

 

 


View this post on Instagram


 

 

Malaal ka trailer dekha kya? @sharminsegal @bhansaliproductions @tseries.official @mangeshhadawale Link in bio


A post shared by Meezaan (@meezaanj) on
तो जावेद जाफ्रीचा मुलगा आहे कळण्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर आला होता. त्यातील मिझानची अॅक्टिंग पाहून अनेकांना बंदे मे कुछ तो दम हैअसे वाटले. म्हणूनच  अगदी काही काळात त्याचे फॉलोवर्स इन्स्टाग्रामवर वाढत आहे. त्याने त्याचे इन्स्टा अकाऊंट नुकतेच वेरिफाईड करुन घेतले आहे. आता त्याचे हेच Hot फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत. शिवाय ते अनेकांना आवडत आहेत.


जूनमध्ये रिलीज होत आहे चित्रपट


malal %281%29


मिझानचा हा पहिला चित्रपट 28 जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील 'आयला रे' हे गाणं काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं. या चित्रपटातील गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य याने केली आहे. जावेद जाफ्री काहीं महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या टोटल धमाल या चित्रपटातून दिसला होता. जावेद जाफ्रीच्या प्रसिद्धीमुळेच आता त्याचा मुलगा कसा असेल अशी उत्सुकता अनेकांना आहे.


मौनी रॉयला नखरे पडले महागात, चित्रपटातून केली हाकालपट्टी


आणखीही स्टार किड पदार्पणाच्या तयारीत


आणखीही काही स्टार किड सध्या पदार्पणाच्या तयारीत असल्याचे कळत आहे. नुकतीच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने #soty2मधून पदार्पण केले. आता या यादीमध्ये आहान पांडे, आरव कपाडिया (अक्षय कुमारचा मुलगा), खुशी कपूर( जान्हवी कपूरची मुलगी)  हे देखील येत्या काही काळात बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.