डान्सर मेलविन लुईससोबत सना खानने या कारणामुळे केलं ब्रेकअप

डान्सर मेलविन लुईससोबत सना खानने या कारणामुळे केलं ब्रेकअप

सोशल मीडियावर आपल्या डान्स मुव्हजवर सगळ्या सेलिब्रिटींना थिरकवणारा डान्सर, कोरिओग्राफर मेलविन लुईससोबत अभिनेत्री सना खानने ब्रेकअप केले आहे. सना खानने हे ब्रेकअप खूप आधीच केल्याची चर्चा होती. पण व्हेलेंटाईन डे अगदी काहीच दिवसांवर असताना सना खानने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. शिवाय तिच्यासोबत काय झाले ते सुद्धा सांगितले आहे. मेलविन तिच्यासोबत जे वागला त्याबद्दलच तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

मेलविनने केली फसवणूक

सना खानने इन्स्टाग्रामवर जी पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने मेलविनसोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. हे ब्रेकअप होण्यासाठी मेलविनच कारण असल्याचे तिने सांगितले असून मेलविनने तिची फसवणूक केल्याचा उल्लेख केला आहे. तिने या भल्या मोठ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझे मेलविनवर प्रेम होते. त्याच्यावर माझा विश्वास होता. मी त्याच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर माझ्या कानावर अनेक गोष्टी आल्या की त्यामुळेच मी हिंमत करुन हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मेलविन माझ्यावर खूप प्रेम करतो असे दाखवत असला तरी ते प्रत्यक्षात खरे नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे. हे समजण्यासाठी मला वर्ष लागले. माझ्या काही गोष्टी निदर्शनास आल्यानंतर मला हे कळले की मेलविन हा असाच फसवूणक करणारा आहे. त्याचा हा स्वभावच आहे. पुढे ती म्हणाली की, मेलविनवर माझा विश्वास असल्यामुळे मी त्याला कधीच काही विचारले नाही. पण ज्यावेळी मी काही गोष्टींचा संशय आल्यानंतर त्याला फोन देण्यास सांगितले. त्यावेळी त्याने त्याच्या फोनमधील चॅट डिलीट करायला सुरुवात केली. त्यामुळे माझा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्याचे गेल्या काही महिन्यांपासून एका मुलीसोबत अफेअर होते हे मला कळले. एका बाजूला माझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवणारा मेलविन दुसरीकडे असा होता हे मला माहीत नव्हते. म्हणूनच मी माझे त्याच्यासोबतचे नाते संपवले. 

सनाला मिळाला फॅन्सचा पाठिंबा

सना खानने ही पोस्ट केल्यानंतर तिच्या फॅन्सकडून तिला पाठिंबा मिळाला आहे. या प्रकरणातून तू सुखरुप बाहेर आल्याचे देखील तिला म्हटले आहे. सेलिब्रिटीही माणसं असतात त्यांच्यासोबत अशा प्रकारची फसवणूक झाल्यावर त्यांनी काय करायचे असा प्रश्न पडतो. पण तरीही सनाने कोणतीही तमा न बाळगता सोशल मीडियावरुन तिची कैफियत मांडली. त्यामुळेच तिला फॅन्सचा सपोर्ट मिळाला आहे. 

मेलविन लुईसने ही पोस्ट केला व्हिडिओ

आता सना खानने इन्स्टाग्रामवर करुन सगळा प्रकार सांगितल्यानंतर मेलविन थोडाच गप्प राहील. त्याने सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. #bulatiheinmaagarjanekanahi  यावर पतंगाचा मांजा लपेटतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याचा अर्थ सना खान जे सांगत आहे ते खोटं आहे असं त्याला म्हणायचं आहे. शिवाय त्याने त्याच्या पोस्टखाली आणखी एक हॅशटॅग वापरला आहे तो आहे #truthwillprevil म्हणजे आता मेलविनकडूनही काही गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत. 

सना आहे एक्स बिग बॉस स्पर्धक

Instagram

सना खानला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉसमधून.त्यामुळेच तिचा फॅन फॉलोविंग जास्त आहे. तिच्या या प्रसिद्धीचा फायदा घेत मेलविनने संधी साधून घेतल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. गायक नेहा कक्करने देखील हिमांश कोहलीसोबत अशाचपद्धतीने ब्रेकअप केले होते. नेहाने सोशल मीडियावर अशाच पद्धतीने पोस्ट केल्या होत्या. तिने ब्रेकअपनंतर एक गाणंसुद्धा पोस्ट केलं.


आता या सगळ्या प्रकरणाचे पुढे काय होते ते सोशल मीडियातूनच आपल्याला कळेल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.