Hotness Overloaded - मिलिंद सोमण आणि अंकिताचा हॉट रोमान्स

Hotness Overloaded - मिलिंद सोमण आणि अंकिताचा हॉट रोमान्स

फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मिलिंद त्याच्या फिटनेस आणि दिसण्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या मिलिंद आपली पत्नी अंकिता कोन्वर बरोबर सुट्टी एन्जॉय करतोय. पण या सुट्टीमध्ये त्याचे व्हायरल झालेले फोटो हे अक्षरशः तुम्हाला वेड लावतील असे आहेत. मिलिंद आणि अंकिताचे स्विमिंग पूलमध्ये काढलेले फोटो हे अतिशय रोमँटिक आणि कोझी असे आहेत. मिलिंदने जेव्हा अंकिताशी लग्न केलं तेव्हा या लग्नाची खूपच चर्चा झाली होती. अंकिता ही मिलिंदपेक्षा वयाने खूपच लहान आहे. त्यामुळे हे लग्न होऊ शकणार नाही ते लग्नापूर्वी अंकिताला लग्न करण्याची इच्छा नाही अशा सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण हे सगळं असूनही दोघांनी लग्न केलं आणि दोघंही नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात.


मिलिंदची रोमँटिक पोझ


milind ankita 1


मिलिंद सोमण हा खूपच प्रसिद्ध मॉडेल आहे. अगदी त्याच्या मॉडेलिंगच्या दिवसापासून ते आतापर्यंत त्याचा हॉटनेस कुठेही कमी झालेला नाही. आजही मुलींमध्ये मिलिंद सोमणची क्रेझ दिसून येते. त्याचे हे फोटो पाहून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे. अंकिता आणि मिलिंदने आपल्या इन्स्टा पेजवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये दोघंही स्विमिंग पूलमध्ये आहेत. या फोटोमध्ये मिलिंदची हॉट अदा पुन्हा एकदा दिसून येत आहे. इतंकच नाही तर आपली पत्नी अंकिताबरोबर मिलिंद असतानाही लक्ष मात्र मिलिंदकडेच जात आहे. मिलिंद या फोटोंमध्ये अंकिताबरोबर खूपच कोझी दिसत आहे. दोघांचाही हा इंटेन्स लुक सर्वांना सध्या भावतोय. या फोटमध्ये अंकिता रेड बिकिनीमध्ये असून हॉट दिसत आहे. मिलिंद सोमण फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक आहे. शिवाय बऱ्याचदा विविध ठिकाणी हे दोघं प्रवास करत असतात. सध्या आपली सुट्टी हे जोडपं एन्जॉय करत असून खूप फोटो पोस्ट करत आहेत. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांचे असे फोटो पाहून आनंदी आहेत.


नुकताच दिसला वेबसिरीजमध्ये


milind %281%29


मिलिंद सोमण मध्येमध्ये आपल्या चाहत्यांना दर्शन देत असतो. नुकताच ‘फोर मोअर शॉट्स’ या वेबसिरीजमध्ये मिलिंदने काम केलं. त्याच्या कामाची आणि नेहमीप्रमाणे त्याच्या दिसण्याची प्रशंसा चाहत्यांकडून झाली. आजही मिलिंद सोमण असला की, दुसऱ्या कोणाकडेही बघण्याची इच्छा होत नाही असा एक त्याचा चाहतावर्ग नक्कीच आहे. या वेबसिरीजमधूनही मिलिंदने आपल्या कामाने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. शिवाय मिलिंद बऱ्याचदा कॅन्सर जागरूकतेसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो. तो पिंकेथॉनचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कामही पाहतो.


मिलिंद सोमण आणि अंकिता सध्या मालदिव्समध्ये

मिलिंद आणि अंकिताला फिरण्याची आवड आहे. आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ मिळेल तेव्हा हे दोघं प्रवास करत असतात. सध्या हे दोघंही मालदिव्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मालदिव्स हे सध्या बऱ्याच सेलिब्रिटीचं आवडतं फिरण्याचं ठिकाण झालं असं म्हटलं नक्कीच चुकीचं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच मलायका - अर्जुन, क्रिती सनॉन, कतरिना कैफ, सैफीना हे सर्व मालदिव्सला सुट्टीची मजा लुटून आले आहेत. मिलिंद आणि अंकिताचे फोटो मात्र सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे आपणही अशी सुट्टी घ्यायला हवी असं कुठेतरी मनात नक्कीच येतंय.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा -


गठबंधनमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांची ग्रॅंड एन्ट्री


टॉप 100 चित्रपटात 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'पडोसन'चा समावेश


परिणीतीही आता बहीण प्रियांका चोप्राच्या मार्गावर