मिलिंद सोमणने शेअर केला शर्टलेस फोटो, कियाराशी होत आहे तुलना

मिलिंद सोमणने शेअर केला शर्टलेस फोटो, कियाराशी होत आहे तुलना

मॉडेल आणि अभिनेता असणारा मिलिंद सोमण आजही कित्येक मुलींच्या हृदयाचा ठेका चुकवतो. मिलिंद सोमण वयाच्या 53 व्या वर्षीही फिटनेस फ्रिक असून त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे अनेक वर्कआऊट फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. या वयातही मिलिंद सोमणच्या मुलींच्या फॉलोअर्समध्ये जराही कमी झालेली नाही. मिलिंद सोमणचा प्रत्येक लुक आजही त्याच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करतो. मिलिंदने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची तुलना कियारा अडवाणीशी करण्यात येत असून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. मिलिंद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यावेळी पुन्हा एकदा त्याच्या या फोटोवरून मिलिंद सोमण चर्चेत आला आहे. 

अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री

शर्टलेस फोटो शेअर केल्यावर मिलिंद होतोय ट्रोल

मिलिंद सोमण नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक शर्टलेस फोटो शेअर केला. ज्यामध्ये नेहमीप्रमाणेच मिलिंद सोमणची स्टाईल ही कमाल आहे. मिलिंदचा हा फोटो दोन झाडांच्या मध्ये क्लिक करण्यात आला आहे. या फोटोमध्ये मिलिंदने शर्ट घातलेला नाही. तर त्याच्या समोर एक झाड आहे. पण या फोटोमुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. असंच यापूर्वी एक शूट फोटोग्राफर डब्बू रतनानी याने कियारा अडवाणीसह केले होते. त्यामुळे मिलिंदच्या या फोटोची तुलना कियारा अडवाणीच्या फोटोसह करण्यात येत आहे. कियारादेखील या फोटोमध्ये झाडांच्या पानामागे टॉपलेस दिसली होती. त्यावेळी कियाराचा हा फोटो खूपच गाजला होता. तसंच कियाराने असे फोटोशूट कसे केले याबाबतही त्यावेळी चर्चा झाली होती. या दोन्ही फोटोमध्ये साम्य असल्यामुळेच मिलिंद सोमणची या फोटोशी तुलना करत नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहेत. मात्र या फोटोमध्ये मिलिंद सोमण नेहमीप्रमाणेच फिटनेस फ्रिक आणि अप्रतिम दिसत असल्याचेही दिसून येत आहे.

Hotness Overloaded - मिलिंद सोमण आणि अंकिताचा हॉट रोमान्स

युजर्सने विचारले मिलिंदला प्रश्न

मिलिंदचा हा फोटो पाहून त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत. कियाराच्या फोटोशी तुलना करत एका युजरने मिलिंदला विचारले आहे की, ‘तुम्ही डब्बू रतनानीसाठी फोटोशूट करू शकता  का सर?’ तर दुसऱ्या युजरने मिलिंदला विचारले आहे की, ‘तू कियाराची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेस का?’ तर मिलिंद सोमणच्या फिटनेसचे चाहते त्याची स्तुती करत असून त्याच्या या फोटोची प्रशंसा करत आहेत. मिलिंद सोमण फिटनेससाठी नेहमीच प्रयत्न करतो. त्याशिवाय तो आपल्या 81 वर्षीय आईचे फिटनेस व्हिडिओदेखील पोस्ट करत असतो. मिलिंद सोमणकडे हा फिटनेस त्याच्या आईकडूनच आला आहे हे यावरून नक्कीच त्याच्या चाहत्यांना लक्षात येत असेल. आजही मिलिंद सोमण वेगवेगळ्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून पोस्ट करत असतो आणि त्याच्या या व्हिडिओ आणि पोस्टना त्याचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. इतकंच नाही तर मिलिंद सोमणच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे हे  वेगळं सांगायला नको. गेले कित्येक वर्ष मिलिंद सोमणने आपला हा चाहता वर्ग जपून ठेवला आहे हे नक्की. 

किंग खानला वाटतेय कोरोनाची भीती, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उचललं 'हे' पाऊल

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा