अभिनेत्री मिनिषा लांबाचं हॉट बिकिनी शूट

अभिनेत्री मिनिषा लांबाचं हॉट बिकिनी शूट

मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकणारी बॉलीवूडची अभिनेत्री मिनिषा लांबा बऱ्याच कालावधीपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र टेलिव्हिजनवर तिने चांगलाच जम बसवला आहे. ‘बिग बॉस 8’ मध्ये स्पर्धक असणारी मिनिषा लांबा 2013 मध्ये जिला गाजियाबाद या चित्रपटात दिसली. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही. पण सध्या टेलिव्हिजनवर मालिकांमध्ये मिनिषा झळकत आहे. बॉलीवूडमध्ये नसली तरीही मिनिषा बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत आहे. मिनिषा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे ती म्हणजे तिने केलेल्या हॉट बिकिनी शूटमुळे. मध्यंतरी मिनिषा बरीच जाडी झाली होती. पण पुन्हा एकदा तिने आपली टोन्ड बॉडी परत मिळवली आहे आणि तिने हॉट बिकिनी शूट केलं आहे. हल्लीच मिनिषाने आपले सेक्सी फोटोज आपल्या अधिकृत सोशल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचा हा अवतार पाहून तिच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झाली नसती तर नवलच. अतिशय सेक्सी फोटो मिनिषाने पोस्ट केल्यानंतर बऱ्याच जणांनी तिला कमेंट द्यायला आणि लाईक करायला सुरुवात केली आहे.


minissha
मिनिषा लांबाचा सनकिस्ड सेक्सी लुक


आपल्या या सनकिस्ड फोटोमध्ये मिनिषाने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून आपले हॉट कर्व्ह्ज फ्लॉंट केले आहेत. पूलजवळ पोझ देऊन काढलेल्या या फोटोमध्ये मिनिषाची सेक्सी फिगर तिचा लुक अजून हॉट करत आहे. मिनिषाच्या चेहऱ्यात मुळातच गोडवा आहे. पण यावेळी मिनिषाच्या परफेक्ट फिगरवरून नजर हटवणं थोडं कठीणच आहे. सध्या परफेक्ट फिगरचा बोलबाला आहे. त्यामुळे प्रत्येक हिरॉईनला अगदी योग्य तऱ्हेने स्वतःची काळजी घ्यावी लागते. आता यामध्ये मिनिषाचाही नंबर लागला आहे. मिनिषाचा असा हॉट अवतार आधी कधी पाहिला गेला नव्हता. पण आता मिनिषा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू लागली आहे. तिने यावेळी केवळ एक नाही तर दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मिनिषाने याआधी जास्त बोल्ड भूमिकाही केलेल्या नाहीत. पण आता तिला या हॉट अवतारात बघून तिचे चाहते तर खूष आहेतच शिवाय आता तिच्या सोशल अकाऊंटवर तिचे फॉलोअर्सही वाढत आहेत. पहिल्यांदाच मिनिषाने असं फोटोशूट केल्याचं दिसत आहे. यापूर्वी मिनिषाच्या अकाऊंटवर असे हॉट फोटोज पोस्ट केलेले बघण्यात आलेले नाहीत.


minissha at poolside


Also Read 40 Amazing Honeymoon Dresses In Marathi


मिनिषा लांबाची पुन्हा चर्चा


मिनिषा लांबाने आतापर्यंत जास्त चित्रपटांमध्ये काम केलं नाही. पण ज्या चित्रपटांमध्ये काम केलं ते चित्रपट लक्षात राहण्यासारखे होते. कॉर्पोरेट, हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, दस कहानिया, जिला गाझियाबाद यासारख्या चित्रपटात मिनिषाने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं असून तिला ओळख मिळाली ती 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटामुळे. या चित्रपटामध्ये मिनिषा रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि बिपाशा बासू यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली होती. नुकतीच टीव्हीवरील ‘तेनाली रामा’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. आता तिने आपला मोर्चा लहान पडद्याकडे वळवला आहे असं म्हणावं लागेल. आता पुन्हा या बिकिनी अवतारानंतर मोठ्या पडद्यावर मिनिषा आपला जलवा दाखवणार का हे पाहावं लागेल.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


आज थुकरट वाडीत रंगणार 'रात्रीस खेळ चाले'चा थरार


आशिकी असावी तर अशी


आजारावर मात करत परतला इरफान खान, लवकरच करणार शूटिंगला सुरुवात