जेव्हा मीरानेच केलं शाहिदला इन्स्टावर ट्रोल

जेव्हा मीरानेच केलं शाहिदला इन्स्टावर ट्रोल

मीरा आणि शाहिद कपूर हे बॉलीवूडमधलं मेड फॉर इच अदर कपल आहे. त्याचं प्रेम जेवढं प्रसिद्ध आहे तेवढीच हे कपल नेहमी सोशल मीडियावर थोडी मजामस्ती करत असतं. असाच एक किस्सा नुकताच झाला. ज्यात पुन्हा एकदा मीराने शाहिदला अलेक्सा वापरता येत नसल्याबद्दल ओरडा दिला म्हणजेच ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

💕

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच जण लॉकडाऊनमध्ये आपाआपल्या घरी बंद आहेत. यामध्ये सेलिब्रिटीजचाही समावेश आहे. तसंच ते जनतेलाही घरीच राहण्याचं आवाहन करत आहेत. क्वारंटाइनदरम्यान मीराने अनेकदा स्किन केअर रूटीन, कुकिंग आणि आयब्रो प्रोब्लेम्स शेअर केले आहेत. तर यावेळी मीराने शाहिदला ओरडा वजा ट्रोल केलं आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये एक डायलॉगही आहे. पाहा हा मीराच्या स्टोरीमधला फोटो.

Instagram

कदाचित हा डायलॉग शाहिद नेहमी वापरतो. या फोटोमध्ये तिने एका वैतागलेल्या माणसाचं GIF अटॅच केलं आहे. यावरून जाहीर आहे की, मीरा शाहिदला अलेक्साला कसं वापरायचं हे न कळल्याबद्दल चिडवत आहे. मग आता असं असल्यावर मीराचं शाहिदवर चिडणं साहजिक आहे ना. साधं अलेक्सा कसं वापरायचं हे कळू नये. काय हे नवरे..हाहाहा.

मीरासाठी शाहिद झाला शेफ

मीरा हा क्वारंटाइनचा वेळ अगदी पुरेपूर वापरत आहे. या आधी तिने आयब्रो शेपचा अपडेट पोस्ट केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नेल पॉलिश फ्लाँट करत फोटो शेअर केले होते. तर दुसरीकडे बायकोसाठी शाहिद कपूर मीराचा शेफ झाला आहे. तो वेगवेगळ्या डिशेस बनवून त्या इन्स्टावर शेअर करत आहे. स्वतः मीरानेही त्याने बनवलेल्या डिशचा फोटो शेअर करत त्यावर लिहील होतं की, मला आनंद आहे की, शाहिदने माझी जबाबदारी त्याच्यावर घेऊन पाहिली. मी ती जबाबदारी सोडली तर त्याने ती घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला.

View this post on Instagram

#us

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

#Shamira च्या नात्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्या लग्नाला आता जवळपास पाच वर्ष झाली आहेत. तेव्हापासून हे कपल एकमेंकाच्या प्रेमात आहे. ते सतत रोमँटिक फोटोज शेअर करत असतात. नुकताच होळीच्या दिवशीही मीराने शाहिदप्रती प्रेम दर्शवणारा फोटो शेअर केला होता. मल्टी कलर्ड टॉप आणि यलो स्कर्ट घातलेल्या मीराने मानेवर SK असा टॅटू काढला होता. त्यावर तिने कॅप्शन लिहीलं होतं लव्ह लाईफ इन टेक्नीकलर.

View this post on Instagram

love life in technicolour

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

शाहिद आणि मीरा कधीच एकमेंकावरचं प्रेम शेअर करण्यात मागे राहत नाहीत. मग ते एक वर्ष पूर्ण झाल्यावरचा क्युट किस फोटो असो वा जसं आत्ता मीराने शाहिदला ट्रोल केलं ते असो. शाहिद, मीरा, मिशा आणि झैन अशी त्यांची क्युट आणि कंप्लीट फॅमिली आहे.

View this post on Instagram

Promises to keep 🌸

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on