प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय 'आम्ही बेफिकर'

प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय 'आम्ही बेफिकर'

कॉलेजगोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या 'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. मराठी चित्रपटांमध्ये सध्या नवे विषय आणि नव्या जोड्या हे अगदी रिफ्रेशिंग आहे. अशीच एक फ्रेश जोडी आता ‘आम्ही बेफिकर’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मिताली मयेकर आणि सुयोग गोऱ्हे हे दोघे प्रमुख भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहेत. ही तरूण जोडी या चित्रपटात दिसणार असून या युवा कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. सध्या मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. असाच वेगळा तरूणाईचा विषय या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अनुभवांचा सगळा खेळ


खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं आपल्याला टीजरमधून पहायला मिळतं. उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला 'आम्ही बेफिकर' हा चित्रपट पाहून प्रेक्षकही आम्ही बेफिकर म्हणतील यात काहीच शंका नाही. हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहीत चव्हाण या चौघांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रोहीत पाटील चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठेंनी केलं आहे. तरूणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.


befikir
सुयोग आणि मिताली यापूर्वी अनेक मालिकांमध्ये


सुयोग आणि मितालीने यापूर्वी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण आता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर एक वेगळा विषय घेऊन येत आहे. या दोघांचाही हा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे त्याचा अनुभव नक्कीच वेगळा आहे. मितालीचा नुकताच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडा झाला असून तिचा हा साखरपुड्यानंतर पहिलाच चित्रपट आहे. मिताली आणि सुयोगबरोबर या चित्रपटामध्ये  त्यांच्यासह राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आतापर्यंत मराठी चित्रपटांमधून त्याच त्याच जोडी पाहिल्यामुळे प्रेक्षकांनाही एक वेगळा अनुभव मिळेल. सर्वांनाच या चित्रपटाची सध्या उत्सुकता असून लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दिसेल. त्यावेळी या चित्रपटाला मराठी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Subscribe to POPxoTV

मिताली आणि सुयोग मराठीतील प्रसिद्ध चेहरे


सुयोग आणि मितालीला मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे. मितालीने आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं असून तिचं फॅन फॉलोईंगदेखील खूपच चांगलं आहे. तर सुयोग मुळात डॉक्टर असला तरीही त्याने अभिनयक्षेत्र करिअर म्हणून निवडलं असून त्यालाही चांगलंच फॅन फॉलोईंग आहे. सुयोगनेही आतापर्यंत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. त्यामुळे नक्कीच ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसाठी नेहमीपेक्षा वेगळी आणि रिफ्रेशिंग ठरेल. त्यामुळे तरूणाईशी नक्की कसा हा चित्रपट संवाद साधणार आहे याचीही उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये आहे. ही फ्रेश जोडी बघण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक असतील. हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित होत आहे. 


हेदेखील वाचा - 


‘आम्ही बेफिकिर’मधून दिसणार फ्रेश जोडी मिताली आणि सुयोग


करणसोबत कॉफी प्यायला येणार आहेत नवे 'स्टुडंट ऑफ द इयर '


सलमान खानने घेतलाय घर सोडण्याचा निर्णय